काश्मीरमध्ये पाककडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त !

भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल ! – संपादक

पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल ! – संपादक

जप्त केलेला शस्त्रसाठा

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये १ एके-४७ रायफल, ३० काडतुसे, ३ मॅगझिन आणि एक दुर्बिण यांचा समावेश होता. सीमेपासून भारतात ६ कि.मी. अंतरावरील सौंजना गावामध्ये ड्रोनद्वारे ही शस्त्रे टाकण्यात आली होती. पाकिस्तानकडून शस्त्रसाठा येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सौंजना गावाला घेराव घालून शोधमोहीम चालू केली होती. त्या वेळी हा साठा मिळाला. हा साठा गावात येऊन कोण व्यक्ती कह्यात घेणार होती, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मे मासामध्ये पाककडून जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवण्यात आली होती.