डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पाकिस्तान आता भांग विक्रीतून पैसे कमावणार !

यात नवीन काहीच नाही ! पाकने यापूर्वी गाढवांची विक्री करून पैसे कमावण्याचा प्रयत्न केलाच होता ! – संपादक

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी (मध्यभागी )

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची आर्थिक स्थिती डबघाईला आली असल्याने ती सुधारण्यासाठी आता पाक सरकार भांग विक्री करणार आहे. यासाठी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी देशातील पहिल्या भांगेच्या शेतीचे उद्घाटन केले. भांग हा एक प्रकारचा मादक पदार्थ असला, तरी जगातील अनेक देशांमध्ये याचा वापर औषध म्हणून केला जातो. फवाद चौधरी यांनी ‘या प्रकल्पाचा आरंभ होणे, ही मोठी गोष्ट आहे’, अशी प्रतिक्रिया ट्वीट करून व्यक्त केली आहे.