रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाजवळ आल्यावर एक वेगळाच सुगंध आणि सात्त्विक थंडावा जाणवणे अन् ‘सनातन आश्रम म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठच आहे’, अशी अनुभूती येऊन भावजागृती होणे

श्री. पवन बर्वे

‘मी नागेशीहून ढवळीला जात होतो. तेव्हा प्रथम रामनाथ देवस्थान आणि नंतर सनातन आश्रम लागतो. मी आश्रमाजवळ आलो आणि मला एक वेगळाच सुगंध अन् सात्त्विक थंडावा जाणवला. मला आश्रमाच्या अगोदर किंवा आश्रमाच्या पुढे गेल्यावर उष्णता जाणवली. तेव्हा मी आणि माझ्या पत्नीने (सौ. प्रांजलीने) ‘रामनाथी आश्रम म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठच आहे’, याची अनुभूती घेतली. ‘मला तो आनंद आणि ओलावा पुन्हा घ्यावा’, असे वाटले; म्हणून मी पुन्हा आश्रमासमोर जाऊन उभा राहिलो. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण आली. ‘गुरुदेवा, या अनुभूतीतून मला शिकवलेत’, याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. पवन बर्वे, वाळपई, गोवा. (२२.११.२०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक