अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध

।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

विधीनियम, दंडविधान (कायदे, कानून), हे अपराध झाल्यावर अपराध्याला शिक्षा देण्यासाठी असतात. ते अपराध घडूच नयेत ह्यावरचे उपाय नाहीत.

अपराध होऊ नयेत ह्यासाठी चांगले संस्कार, धर्माचरण, भक्ती आणि कर्मफलन्यायाची जाणीव आवश्यक असतात; परंतु हे समाजात रुजवण्याची पद्धत लुप्त झाली आहे आणि जाणूनबुजून लुप्त केली गेली आहे. अपराध कमी होत जाण्यासाठी ती पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक आहे, कारण दुसरा उपायच नाही.

– अनंत आठवले (२५.६.२०२१)

(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

(समाप्त)