म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ?

।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ? मग नका ठेवू ना ! हे बघा, परमसत्य जाणण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दुसरे सांगतात त्यावर विश्वास ठेवा; नाही तर स्वतः शोधून काढा. शेवटी तिथेच पोहोचाल ! पण स्वतःला उमजत नाही आणि दुसरे सांगतात ते मानायचे नाही, अशी गत नको.

– अनंत आठवले (१५.६.२०२१)

(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)      

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)