शिक्षणक्षेत्राला काळीमा फासणारी घटना !
अशांवर तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होणे आवश्यक ! असे झाले, तरच लैंगिक अत्याचारांचे प्रकार थांबतील ! – संपादक

होशंगाबाद (मध्यप्रदेश) – एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे अनेक मास लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी येथील प्रसिद्ध ‘काशिव सर ॲकॅडमी’चा संचालक यु.के. काशिव याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनीला ‘तुझ्या आईचा अपघात घडवून तिला ठार मारणार’, अशी धमकी देऊन त्याने तिचे अनेक मास लैंगिक शोषण केले. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काशिव हा पीडितेचे जानेवारीपासून लैंगिक शोषण करत होता. २२ सप्टेंबर या दिवशी आरोपीने पीडितेशी असभ्य वर्तन केल्यानंतर तिने घरी जाऊन कुटुंबियांना सर्व स्थिती कथन केली. कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली. पीडित मुलगी ११ वीची विद्यार्थीनी असून तिच्या वडिलांचे निधन झाले आहे.
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक