‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे आणि लक्षात आलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘१७ ते २३ जून २०२१ या कालावधीत आम्ही काही साधकांनी ध्वनिक्षेपकावर ‘निर्विचार’ हा नामजप ऐकला. तो ऐकत असतांना मला पुढील सूत्रे जाणवली.

कु. मधुरा भोसले

१. ‘प्रयोगाला जायचे आहे’, हे समजल्यावर जाणवलेली सूत्रे

१८.६.२०२१ या दिवशी जेव्हा मला समजले की, ‘निर्विचार’ या नामजप ऐकण्याचा प्रयोग सायंकाळी ५ ते ५.१० या कालावधीत होणार आहे. या प्रयोगात मला सहभागी व्हायचे आहे’, तेव्हा मला थकवा जाणवून झोप येऊ लागली. ‘मी नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी होऊ नये’, यासाठी ‘पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्ती मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे मला जाणवले.

२. प्रयोगाच्या वेळी ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. शीतल लहरी वातावरणात पसरणे आणि मनातील विचारांचे प्रमाण न्यून होणे : मला नामजपातून शीतल लहरी वातावरणात प्रक्षेपित होतांना जाणवल्या. त्यानंतर माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून होऊन माझे मन शांत झाले.

२ आ. प्रयोगाच्या वेळी नामजप करतांना मन आणि बुद्धी यांवर नामजपातील स्पंदनांचा परिणाम होऊन माझा मनोदेह अन् कारणदेह (बुद्धी) या सूक्ष्म देहांची शुद्धी झाल्याचे जाणवणे : हा नामजप ऐकतांना नामजपातील स्पंदने माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांत खोलवर जातांना जाणवली. त्यानंतर माझ्या डोक्यावरील त्रासदायक आवरण दूर झाले. माझ्या मनातील रज-तमात्मक विचारांचे नामजपातील चैतन्याशी सूक्ष्म युद्ध झाल्याचे जाणवले आणि त्यामुळे माझ्या मनातील अनावश्यक अन् नकारात्मक विचार नष्ट झाले. त्याचप्रमाणे मला सात्त्विक विचार करण्यासाठी नामजपातील चैतन्य मिळून माझ्या मनावरील नामजपाचा संस्कार दृढ झाल्याचे जाणवले. जेव्हा माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाला, तेव्हा माझे मन आणि बुद्धी यांवर नामजपातील स्पंदनांचा परिणाम होऊन माझा मनोदेह आणि कारणदेह या सूक्ष्म देहांची शुद्धी झाल्याचे जाणवले.

२ इ. साधिकेच्या समोरील भिंतीवर सूक्ष्मातून ‘निर्विचार’ हा नामजप पांढर्‍या अक्षरांत लिहिलेला दिसल्यावर आलेल्या अनुभूती : नामजप ऐकतांना मला माझ्या समोरील भिंतीवर तो सूक्ष्मातून पांढर्‍या अक्षरांत उमटलेला दिसला. तेव्हा ‘निर्विचार’ हा नामजप तेजतत्त्वाच्या स्तरावर शब्दांच्या माध्यमातून प्रगट झाल्याचे जाणवले. हा नामजप करत असतांना मला वार्‍याची गार झुळूक स्पर्श करून गेल्याचे जाणवले. ‘हे वायूतत्त्वाच्या स्तरावर प्रगट झालेले नामजपातील चैतन्य आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर मला नामजपातील शब्द ऐकू न येता तो मनातल्या मनात पुटपुटल्याचा नाद ऐकू आला. ‘ही नामजपातील चैतन्याची आकाशतत्त्वाच्या स्तरावरील अनुभूती आहे’, असे जाणवले. त्यानंतर माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला शांत वाटू लागले.

२ ई. देहामध्ये निर्गुण पोकळी निर्माण झाल्याचे जाणवणे : नामजप करत असतांना निर्गुण चैतन्याचा प्रवाह माझ्या सहस्रारचक्राच्या वाटे माझ्या देहात जाऊन माझ्या देहात निर्गुण पोकळी निर्माण झाल्याचे मला जाणवले. ‘या पोकळीमध्ये मनातील सर्व विचार निर्माण होण्यापूर्वीच विलीन होत आहेत’, असे मला जाणवले.

२ उ. मनातील ज्या केंद्रातून विचारांचा उगम होत होता, ती केंद्रे निर्गुण चैतन्याच्या झाकणाने झाकल्याचे जाणवणे : माझ्या मनातील ज्या केंद्रांतून विचारांचा उगम होत होता, ती केंद्रे निर्गुण चैतन्याच्या झाकणाने झाकल्याचे जाणवले. त्यामुळे माझ्या मनात येणार्‍या विचारांचे एकूण प्रमाण अत्यंत न्यून होऊन सलग ५ मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप केल्यावर माझ्या मनातील विचार पूर्णपणे थांबले आहेत’, असे मला जाणवले.

२ ऊ. नामजप थांबवल्यावर जाणवलेली सूत्रे : नामजप थांबल्यानंतरही मला सूक्ष्मातून ‘निर्विचार’ या नामजपाचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवले आणि त्यानंतर मला निर्गुण तत्त्व जाणवून शांतीची अनुभूती आली.

३. ‘निर्विचार’ या नामजपाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

‘निर्विचार’ हा नामजप आकाशतत्त्वापेक्षाही सूक्ष्मतम असून त्यामध्ये ईश्वराचे निर्गुण चैतन्य कार्यरत झाले आहे. त्यामुळे हा नामजप करत असतांना सगुणाशी संबंधित असणारे विचार विरून जातात आणि नामधारकाच्या सूक्ष्म देहांमध्ये निर्गुण चैतन्य कार्यरत होते. इतर नामजप करतांना डोळ्यांपुढे एखाद्या देवतेचे रूप किंवा तिच्या तत्त्वाचा रंग दिसतो; परंतु ‘निर्विचार’ हा नामजप करतांना कोणतेच रूप किंवा रंग दिसत नाही. त्यामुळे मन निर्विचार होण्यास साहाय्य होते.

४. आध्यात्मिक पातळीनुसार ‘निर्विचार’ या नामजपातील स्पंदने ग्रहण करण्याची क्षमता

५. आध्यात्मिक पातळीनुसार ‘निर्विचार’ या नामजपामुळे मन निर्विचार होण्याचे प्रमाण

टीप – २० टक्के पातळीच्या व्यक्तीमध्ये रज-तम यांचे प्रमाण पुष्कळ असल्यामुळे त्यांना ‘निर्विचार’ या नामजपातील चैतन्य अनुभवण्यास कठीण जाते. त्यामुळे त्यांच्या मनातील विचार अल्प प्रमाणात न्यून होतात. याउलट ६० टक्के पातळीनंतर व्यक्तीमध्ये निर्गुण चैतन्य धारण करण्याची क्षमता आध्यात्मिक पातळीसह उत्तरोतर वाढत जाते आणि मनातील विचारांचे प्रमाण पुष्कळ न्यून होते. त्यामुळे ‘निर्विचार’ हा नामजप ६० टक्के पातळीच्या पुढील साधकांसाठी अधिक उपयुक्त आहे.

६. विविध नामजप आणि त्यांच्या अनुभूतींचा स्तर

७. कृतज्ञता

‘श्रीगुरूंच्या कृपेमुळे साधकांना विविध टप्प्यांवरील नामजप करून विविध स्तरांवरील चैतन्य अनुभवता आले’, यासाठी आम्ही सर्व साधक श्रीगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक