लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

बरेली (उत्तरप्रदेश) येथे उपचाराच्या निमित्ताने धर्मांधाकडून महिलेची फसवणूक

  • धर्मांतर करून लग्न करण्याचा प्रयत्न

  • धर्मांधाने महिलेचे १६ लाख रुपये लाटले

(प्रतिकात्मक छायाचित्र)

बरेली (उत्तरप्रदेश) – तांत्रिक उपचार करण्याच्या निमित्ताने एका धर्मांधाने विधवा महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक केली, तसेच धर्मांतर करून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीसात तक्रार देण्यात आली असून अन्वेषण चालू आहे.

यासंदर्भात पीडितेने पोलीस महानिरीक्षक कार्यालयामध्ये माहिती दिली असून त्यानंतर येथील बारादरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. या वेळी पीडितेने सांगितले की, तिचा मुलगा अनेक दिवसांपासून आजारी आहे. काही दिवसांपूर्वी एका मंदिरामध्ये तिची एका युवकाशी भेट झाली. त्याने घरातील अडचणी दूर करण्यासाठी एका तांत्रिकाशी भेट करून दिली. त्यानंतर त्या मांत्रिकाने उपचार करून देण्याच्या निमित्ताने या महिलेला १६ लाख रुपयांना फसवले. मिळालेल्या माहितीनुसार एक दिवस आरोपी त्याच्या दोन सहकार्‍यांसमवेत पीडितेच्या घरी पोचला. त्यानंतर त्यांनी तिच्यावर धर्मांतर करून लग्न करण्यासाठी दबाव निर्माण केला. या वेळी त्यांनी बळजोरीने तिला नेपाळला घेऊन जाण्याचाही प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यावर आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली आणि निघून गेले.

‘ग्रूमिंग जिहाद’ टोळीच्या माध्यमातून हिंदु तरुणींचे धर्मांतर

उत्तरप्रदेश पोलिसांनी यापूर्वी बदायू जिल्ह्यातून ‘ग्रूमिंग जिहाद’ टोळीचा सूत्रधार सैय्यद निजाम याला अटक केली आहे. बरेली जिल्ह्यातील जगतपूर येथील निजाम स्वत:ला तांत्रिक असल्याचे सांगून हिंदु तरुणींचे धर्मांतर करत होता. त्याने १२ हून अधिक मुलींचे धर्मांतर केले असून त्यांच्याकडून २५ लाख रुपये लाटले आहेत. तो मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर बळजोरीने त्यांचे धर्मांतर करायचा. या ‘ग्रूमिंग जिहाद’ टोळीमध्ये त्याच्यासमवेत आणखी १२ जण सहभागी आहेत.


सुपौल (बिहार) येथे महिलेचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

  • काही मास बंधक बनवून ठेवले

  • गोमांस खायला देऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न

बिहारमध्ये धर्मांध महिलांना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करतात, याचा अर्थ तेथे अजूनही कायद्याचे राज्य आणि त्याचे भय नाही, असे सर्वसामान्यांना वाटल्यास चुकीचे ते काय ? – संपादक

पाटलीपुत्र (बिहार) – सुपौल येथे एका धर्मांधाने महिलेचे अपहरण करून तिचे काही मास लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. धर्मांधाने पीडितेला गोमांस खाण्यास भाग पाडले, तसेच तिचे बळजोरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भीमपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सुपौल येथे ३० जूनच्या सायंकाळी एक महिला शौचाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्या वेळी कलीम याने तिचे अपहरण केले आणि तिला एका खोलीमध्ये बंधक बनवून ठेवले. त्यानंतर त्याने काही मास तिचे लैंगिक शोषण केले. एवढेच नाही, तर गोमांस खाऊ घालून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव निर्माण केला. अपहरणाच्या वेळी पीडितेच्या डोळ्यांवर कापड बांधले असल्याने तिला कुठे बंधक बनवले आहे, हे कळले नाही; परंतु कालांतराने ती फारबिसगंज येथे रहात असल्याचे तिला समजले. याविषयी तिने तिच्या कुटुंबाला माहिती दिली. याचा कलीमला सुगावा लागला. त्यामुळे तो पीडितेला दुसर्‍या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर पोचला. त्या वेळी पीडितेच्या एका परिचिताने एका संस्थेचे साहाय्य घेऊन कलीमला रेल्वेस्थानकावर पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या आरोपी पोलिसांच्या कह्यात असून पुढील चौकशी चालू आहे.


अलीगड (उत्तरप्रदेश) येथील धर्मांधाने हिंदु प्रेयसीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलले !

  • ‘दीपक’ नावाने पीडितेशी प्रेमसंबंध ठेवले !

  • धर्मांधाकडून पीडितेचा प्रचंड छळ

  • पायांना सिगारेटचे चटके दिले

सुधारणावादी ‘लव्ह जिहाद’चे वास्तव स्वीकारणार आहे कि, आताही हिंदु मुलींनी ‘लव्ह जिहाद्यां’ना बळी पडून देहविक्रीच्या नरकात खितपत पडावे, असे वाटते ? – संपादक

अलीगड (उत्तरप्रदेश) – एका धर्मांधाने ‘दीपक’ नावाने युवतीला प्रेमपाशात ओढले आणि नंतर तिला बळजोरीने देहविक्रीच्या व्यावसायात ढकलले. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

१. अलीगड जिल्ह्यातील देहली गेट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्‍या घुडियाबाग भागात पीडिता रहाते. गेल्या दोन वर्षांपासून शाहरूख याने ‘दीपक’ या हिंदु नावाने पीडितेशी प्रेमसंबंध ठेवले. दोन मासांपूर्वी एक दिवस त्याने पीडितेला बाहेर फिरायला नेले आणि भुजपुरा येथील एका घरामध्ये सोडून दिले. तेथे बळजोरीने अमली पदार्थ देऊन देहविक्रीच्या व्यवसायामध्ये ढकलले. यासाठी त्याच्या नातेवाइकांनीही त्याला साहाय्य केले.

२. शाहरूखच्या तावडीत असतांना पीडितेचा प्रचंड छळ करण्यात आला. देहविक्रीला विरोध केल्यामुळे त्याने पीडितेच्या पायांना सिगारेटचे चटके दिले. एक दिवस पीडितेने संधी साधून आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली.

३. त्यानंतर तिला परिचित हिंदुत्वनिष्ठ युवकांनी आश्रय दिला आणि पोलीस ठाण्यात पोचवले. तेथे आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची सूचना मिळाल्यावर माजी महापौर शकुंतला भारती यांनी पोलीस ठाणे गाठले आणि त्यांना आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना केली.


धर्मांधाकडून सामाजिक माध्यमांवर बनावट खाते बनवून अल्पवयीन मुलींची फसवणूक

  • ९ ते १५ वर्षे वयोगटातील १५० हून अधिक मुलींना जाळ्यात ओढले

  • अश्लील ध्वनीचित्रफिती आणि छायाचित्रे मागवून मुलींना ‘ब्लॅकमेल’ केले

अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या अशा नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे. असे झाल्यास तसे कुकृत्य करण्याचे कुणीही धाडस करणार नाही ! – संपादक

लक्ष्मणपुरी (लखनौ) – सामाजिक माध्यमांवर बनावट खाते बनवून अल्पवयीन मुलींची फसवणूक केल्याप्रकरणी अब्दुल समद या ‘मेकॅनिक’ला (तंत्रज्ञाला) अटक करण्यात आली. त्याच्यावर ९ ते १५ वर्षे वयोगटातील १५० हून अधिक मुलींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्याकडून भ्रमणभाषसंचासह अनेक मुलींच्या अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे कह्यात घेतली आहेत.

१. पोलिसांच्या माहितीप्रमाणे २३ वर्षीय अब्दुल समद याने ‘इन्स्टाग्राम’वर महिलेच्या नावाने बनावट ‘प्रोफाईल’ बनवले होते. त्याच्या ‘प्रोफाईल’वर एका सुंदर मुलीचे छायाचित्र ठेवले होते. त्या आधारे तो महिला असल्याचे इतरांना भासवत होता. तो संदेशांच्या माध्यमातून मुलींशी संवाद साधायचा. त्यानंतर त्यांना त्यांची अश्लील छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीती पाठवण्यास सांगायचा. त्यानंतर तो त्यांना ‘ब्लॅकमेल’ करायचा.

२. एका १५ वर्षांच्या मुलीने २७ ऑगस्ट या दिवशी त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे उत्तरप्रदेश पोलिसांनी ‘व्हॉट्सॲप’ आणि ‘इन्स्टाग्राम’ यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून आरोपीचे भ्रमणध्वनी क्रमांक आणि इन्स्टाग्राम ‘आयडी’  माहिती मागवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला लक्ष्मणपुरी येथून अटक केली.

३. आरोपीने सांगितले की, तो ‘टेक्स्ट नाऊ’ सारख्या ‘ॲप’च्या माध्यमातून मुलींना संदेश पाठवायचा. याखेरीज आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मुलींना ‘व्हिडिओ कॉल’ करायचा.