तव चरणी मज घेशील का रे कान्हा ।

श्री. देवदत्त व्हनमारे

थकलो मी या मायेला ।
स्वभावदोष आणि
अहं मध्ये गुरफटूनी ।
सतत दुःख मिळते रे मनमोहना ।
तव चरणी मज
घेशील का रे कान्हा ।। १ ।।

मनामधील मायेचे विचार सतत तुझ्यापासून दूर घेऊन जातात ।
तुझ्या चरणांच्या आनंदापासून दूर घेऊन जातात ।।
तुझ्या नामाचा सतत ध्यास लागेल का रे गोविंदा ।
तव चरणा मज घेशील का रे कान्हा ।। २ ।।

नाना प्रकारे सवलत घेते मन साधना करतांना ।
साधना हे एकमात्र ध्येय आहे, हे विसरून जाते मन ।
या ध्येयाची सतत आठवण करून देशील का रे कृष्णा ।
तव चरणी मज घेशील का रे कान्हा ।। ३ ।।

हे नारायणा, तव चरणांचा छंद असा लागावा ।
तुझा कधी न विसर पडावा ।
स्थळी, काष्ठी, पाषाणी ।
सतत मिळावा तुझ्या चरणांचा विसावा ।। ४ ।।

एवढी कृपा करशील का रे दयाघना ।
तव चरणी मज घेशील का रे कान्हा ।। ५ ।।

– श्री. देवदत्त व्हनमारे, (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) सोलापूर