त्यागाने ध्येय लवकर गाठले जाणे

।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

जप-तप करणे, पूजा-पाठ करणे, दया-क्षमा-प्रेम इत्यादी गुण आत्मसात् करणे अशांसारख्या विध्यात्मक (करणे) साधनेपेक्षा वस्तू आणि स्वजनांमधील ममतेचा त्याग, कामनांचा आणि अहंकाराचा त्याग, षड्रिपूंचा त्याग अशी निषेधात्मक (सोडणे) साधना श्रेष्ठ आहे. त्यागाने ध्येय लवकर गाठले जाईल.

–  अनंत आठवले (२५.१०.२०२०)

(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)