देवद आश्रमातील श्री. नटवरलाल जाखोटिया यांचे वय ६६ वर्षे आहे; पण एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशी ते सेवा करतात. त्यांची पत्नी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. रेखा जाखोटिया (जीजी) या १० वर्षे अंथरुणाला खिळून होत्या. काकांना त्यांची सेवा करावी लागे. ते आनंदाने त्यांची सेवा करत. (१६ जून २०२१ या दिवशी सौ. रेखा जाखोटिया यांचे निधन झाले.)
देवद आश्रमातील साधकांना श्री. नटवरलाल जाखोटिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. राधा साळोखे
१ अ. ‘काकांचे मन लहान मुलासारखे निर्मळ आहे.
१ आ. प्रेमभाव : मी १ – २ दिवस दिसले नाही, तर ते माझ्या यजमानांकडे माझी विचारपूस करतात आणि त्यांना आवर्जून सांगतात, ‘‘राधाला सांगा, मी विचारले म्हणून !’’ त्यांनी प्रेमाने केलेल्या चौकशीमुळे मला बरे वाटते.
१ इ. प्रांजळपणा : काकांना नियमित सारणी लिखाण करायला जमत नाही. याविषयी त्यांना पुष्कळ खंत वाटते. ते मला प्रांजळपणे सांगतात, ‘‘चुका माझ्या लक्षात येत नाहीत. तुम्ही एवढे लिखाण कसे करता ? मला जमत नाही.’’ ते कुठेही प्रतिमा जपत नाहीत.
१ ई. आजारी पत्नीची सेवा मनापासून करणे : त्यांच्या पत्नीची सेवा ते मनापासून करतात. ‘अधिकाधिक चांगली सेवा कशी करू ?’, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे जीजी असाध्य आजारातही आनंदी राहू शकतात.
१ उ. इतरांना समजून घेणे : जीजींना पलंगावरून आसंदीवर आणि आसंदीवरून पुन्हा पलंगावर घेण्यासाठी २ साधकांचे साहाय्य लागते. त्यासाठी त्यांना ४ – ५ साधकांना विचारावे लागते. काही साधक त्या वेळी ‘वेळ नाही’, असे सांगतात किंवा इतर कारणे सांगतात; पण काका कधीही निराश होत नाही. ‘साधकांची काही अडचण असेल किंवा त्यांना महत्त्वाची सेवा असेल’, असा विचार करून ते त्या साधकांना समजून घेतात.
१ ऊ. निरपेक्षता : काका कोणतीही सेवा निरपेक्षपणे करतात. त्यांना कौतुकाची अपेक्षा नसते; पण कुणी त्यांचे कौतुक केले, तर त्यांना लहान मुलांसारखा आनंद होतो.
काकांना त्यांच्या सुनेकडून कोणतीही अपेक्षा नसते. तिला ते सून न मानता साधिकेसारखेच वागवतात.
१ ए. त्यांच्याकडून एखादी चूक झाली, तर ‘ती चूक परत होऊ नये’, अशी त्यांची तळमळ असते.’
२. सौ. स्मिता नाणोसकर आणि सौ. जया साळोखे
२ अ. इतरांचा विचार करणे : ‘सेवेची तातडी असेल, तेव्हा ते विश्रांतीही अल्प घेतात, उदा. गोमूत्राची मागणी असेल; पण गोमूत्र तपासले नसेल, तर साधकांना गोमूत्राच्या बाटल्यांवर पत्रके लावायची सेवा मिळत नाही. तेव्हा ‘साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, असा विचार करून आणि साधकांना सेवा उपलब्ध व्हावी; म्हणून ते विश्रांती न घेता गोमूत्र तपासण्याची सेवा करतात.
२ आ. सेवाभाव : कापराचे खोके फोडून त्याचे वजन करणे, पसारा आवरणे, रिकामी खोकी बांधून ठेवणे, आलेले साहित्य उतरवून घेणे, उत्पादनांचे पॅकिंग करणे, गोमूत्र तपासणे इत्यादी सेवा ते करतात. थोडक्यात पडेल ती सेवा ते करतात.
जीजी माहेरी गेल्यावर त्यांना सेवेला भरपूर वेळ मिळतो. तेव्हा ते झोकून देऊन सेवा करतात.
काका स्वच्छता चांगल्या प्रकारे करतात. आश्रमाला प्रदक्षिणा घालत देवपूजेच्या तीर्थाचे प्रोक्षण करण्याची सेवाही ते करतात. त्यात ते कधीही सवलत घेत नाहीत.
२ इ. साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
२ ई. त्यांना कुणी चूक सांगितली, तर ते स्वीकारतात. ते कुणावरही रागवत नाहीत.
२ उ. ‘आश्रम आपला आहे’, असा त्यांचा भाव असतो.’
३. श्री. रमेश सावंत
अ. काका आश्रमातील आणि सेवेतील प्रत्येक कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करतात.
आ. ते साधकांच्या साहाय्याला सदैव सिद्ध असतात.’
४. अनुभूती
अ. ‘एकदा काकांनी सेवेची मोठी खोली एकट्याने आवरली. नंतर त्यांनी लादी पुसली. त्या वेळी त्यांनी सर्व साधकांना थोडा वेळ बाहेर जायला सांगितले. लादी सुकल्यावर सर्व जण आत आले. तेव्हा सर्वांना थंड आणि शांत वाटले. एका साधकाने ‘ध्यानमंदिरात आल्यासारखे वाटले’, असे सांगितले.’ – सौ. स्मिता नाणोसकर आणि सौ. जया साळोखे
आ. ‘वरील सूत्रांचे टंकलेखन करतांना मला पुष्कळ जांभया आल्या आणि स्वतःवर उपाय झाल्याचे जाणवले. – सौ. रेखा जाखोटिया
५. प्रार्थना
‘काकांमधील गुण आम्हाला शिकता येऊन त्यांच्यासारखी आमचीही साधनेची तळमळ वाढू दे’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’ – सर्व सहसाधक (२१.१.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |