शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट !

डावीकडून श्री. सुरेश यादव, पंचांग पहातांना श्री. धैर्यशील माने, सौ. राजश्री तिवारी

कोल्हापूर, १९ सप्टेंबर (वार्ता.) – शिवसेनेचे खासदार श्री. धैर्यशील माने एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरोली येथे आले असता हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. ‘‘या पंचांगात देवतांची सात्त्विक चित्रे आहेत’’, असे सौ. तिवारी यांनी श्री. माने यांना सांगितले. या वेळी शिरोली येथील सरपंच शशिकांत (भाऊ) खवरे, उपसरपंच श्री. सुरेश यादव, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे कोकण, तथा गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, श्री. शिवानंद स्वामी, श्री. विपुल भोपळे उपस्थित होते.