प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे एका आतंकवाद्याची शरणागती

देशात हिंदूंच्या सणांच्या वेळी घातपात करण्याचे रचत होता षड्यंत्र !

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – काही दिवसांपूर्वी देहली पोलिसांच्या विशेष शाखेने देशातून ६ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली होती. यांतील एक आतंकदावी ओसामा याचा काका हुमैद-उर-रहमान याने प्रयागराज येथील करेली पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली आहे. त्याला आता देहलीला आणण्यात येणार आहे. पोलिस हुमैद याचा शोध घेत होते.

ओसामाचा पिता उसैद-उर-रहमान हा दुबईत इस्लामिक स्टेटचा ‘हँडलर’ आहे. हँडरल म्हणजे अन्य देशांतून दुसर्‍या देशातील स्थानिक आतंकवाद्यांना घातपाताविषयी, तसेच अन्य गोष्टींविषयी मार्गदर्शन करणारा होय. हुमैद-उर-रहमान दुबईत बसलेल्या उसैद-उर-रहमान या त्याच्या भावाच्या सांगण्यावरून भारतातील घातपाताच्या कटाचे षड्यंत्र रचत होता. पाकिस्तानात आतंकवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या जीशान याला साहाय्य करण्याचे काम हुमैद यानेच केले होते. भारतात या घातपात करण्याच्या मागे खरा सूत्रधार ओसामाचा पिता उसैद-उर-रहमान हाच आहे. तो सध्या दुबईमध्ये आहे आणि तेथे जे मदरसा चालवत आहे. (भारतात मदरसा चालवणारे किती जण निरपराध आहेत, याचीही प्रत्येक राज्याने तपासणी करणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर येते ! – संपादक) तो थेट इस्लामिक स्टेटच्या संपर्कात आहे.