अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणार्याला पाठीशी घातल्याचा आरोप
चर्चमधील पाद्य्रांकडून होणार्या नन, मुले, मुली आदींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात साम्यवादी कधी आवाज उठवतात का ? केरळमध्ये अशा अनेक घटना घडल्या असतांना साम्यवाद्यांकडून पाद्य्रांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न होतो; मात्र हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांना अपकीर्त करण्यास मात्र साम्यवादी आघाडीवर असतात, हाच साम्यवाद्यांचा ढोंगीपणा आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
कोळीकोड (केरळ) – येथील ‘अद्वैत आश्रम’ आणि त्यांचे प्रमुख स्वामी चिदानंदपुरी यांच्यावर केरळच्या साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. स्वामी चिदानंदपुरी नेहमीच हिंदुत्वाच्या समर्थनार्थ उभे असतात. हिंदु धर्मावरील आघातांचा ते विरोध करत असतात. त्यामुळेच त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
१. जानेवारी २०१८ मध्ये आश्रमाच्या ‘श्री शंकरा न्यासा’च्या भूमीवर ‘केरला स्टेट स्पोर्ट्स काउंसिल’, ‘केरला कलरीपयट्टू असोसिएशन’ आणि ‘मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स’ या सरकारी संघटनांकडून मान्यताप्राप्त ‘पेरंब्रा शिव शक्ती केंद्रा’ला कलरीपयट्टू (केरळमधील कराटेचा प्रकार) शिकवण्याकरता समाजाकडून आलेल्या मागणीमुळे जागा देण्यात आली. श्री. मजींद्रन् गुरुक्कल हे या या केंद्राचे मुख्य होते.
२. वर्ष २०१८ मध्ये केरळ राज्यात आलेल्या पुरामुळे हे केंद्र काही मास बंद होते. त्यानंतर पुन्हा काही काळ वर्ग चालू झाले होते; परंतु कोरोनाच्या महामारीमुळे ते पुन्हा बंद करण्यात आले. अनेक मुले आणि मुली या केंद्रात शिक्षण घेत होत्या. या कालावधीमध्ये श्री. मजींद्रन गुरुक्कल यांनी अल्पवयीन मुलीचे शोषण केले, असा आरोप आता बाहेर आला आहे. त्यावेळी त्या मुलीचे वय ११ वर्षे होते. तिला आता मानसिक त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आल्यावर तिचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे श्री. मजींद्रन् यांना अटक करण्यात आली.
३. स्वामीजी आणि आश्रम यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसतांना कलरीपयट्टूसाठी देण्यात आलेली जागा आश्रमाची आहे, या एका कारणाने स्वामीजी अन् आश्रम यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
४. या प्रकरणी न्यायायलीन पद्धतीने सर्व अन्वेषण व्हायला हवे, असे स्वामीजी आणि आश्रम व्यवस्थापन यांचे मत आहे. आश्रम आणि स्वामीजी पोलिसांना योग्य ते सहकार्य करत आहेत.
अद्वैत आश्रमाचे स्वामी चिदानंदपुरी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणारे साम्यवादी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ननवरील अत्याचार’ प्रकरणी गप्प का ? – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
स्वामी चिदानंदपुरी नेहमीच हिंदुत्वाच्या समर्थनार्थ उभे असतात. हिंदु धर्मावरील आघातांचा ते विरोध करत असतात. त्यामुळेच त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. हिंदु संतांना बदनाम करण्याचा साम्यवाद्यांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही, यापूर्वीही साम्यवाद्यांनी असे प्रयत्न अनेकदा केले आहेत. स्वामीजींचा ज्या व्यक्तीशी काही संबंध नाही, त्या व्यक्तीच्या चुकीच्या कृतीमुळे स्वामीजींना का लक्ष्य केले जात आहे ? स्वामी चिदानंदपुरी यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्याला पाठीशी घातल्याचा बिनबुडाचा आरोप करणारे साम्यवादी हे केरळमधील ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून हिंदु मुलींचे शोषण होत असल्याविषयी किंवा ननवर लैंगिक अत्याचार करणार्या बिशप फ्रँको मुलक्कल प्रकरणात गप्प का होते ? हाच साम्यवाद्यांचा ढोंगीपणा आहे. यातून साम्यवाद्यांना अन्यायाच्या विरोधात नाही, तर हिंदु धर्म, हिंदु संत, हिंदु संस्कृती यांच्या विरोधात लढायचे आहे, हेच स्पष्ट होते. अद्वैत आश्रमाचे स्वामी चिदानंदपुरी यांच्यावरील आरोप निराधार असून आम्ही स्वामीजींच्या पाठीशी आहोत, अशी ठाम भूमिका हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.