एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
आस लागली मना गुरुभेटीची ।
परी चित्तावर संस्कार तसेची असती ।। १ ।।
स्वभावदोष-अहंकार अंगी असता ।
कसे भेटतील मज गुरुनाथा ।। २ ।।
शरण आले मी गुरुराया ।
कृपा करा मजवर गुरुनाथा ।। ३ ।।
श्रद्धा, भाव अन् तळमळ अंगी येऊ द्या ।
वरदहस्त असू द्या आमच्या माथा ।। ४ ।।
लीन होऊ द्या आता चरणी ।
विनवणी करते मी श्री गुरुचरणी ।। ५ ।।
– सौ. जयश्री दहिसरकर, जागमाता, ठाणे. (१०.५.२०२०)