उत्तरप्रदेशमध्ये ८ धर्मांधांवर भारताच्या विरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यात धर्मांतरप्रकरणी अटक केलेल्या ८ धर्मांधांवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवत आतंकवादविरोधी पथकाने महंमद उमर गौतम, मुफ्ती काझी जहागीर आलम कासमी, सलाहुद्दीन जैनुद्दीन शेख, इरफान शेख उपाख्य इरफान खान, डॉ. फराज, ॲडम, अरसलन आणि कौसर आलम यांना अटक केली आहे. महंमद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहागीर आलम कासमी या मौलवींना अटक केल्यावर सहस्रो लोकांच्या धर्मांतरामध्ये त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.