राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ४.९.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

कधी यश मिळाले, तर ‘देवामुळे मिळाले’, असे एकतरी भारतीय नेता म्हणतो का ?

मौलाना शमसुद्दीन कासिमी

‘अल्लामुळेच तालिबान्यांनी अफगाणिस्तावर दुसर्‍यांदा नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे सर्व मुसलमानांनी आनंदोत्सव साजरा केला पाहिजे’, असे विधान तमिळनाडूतील मौलाना (इस्लामी अभ्यासक) शमसुद्दीन कासिमी यांनी केले आहे.’


देशद्रोह्यांना पाकमध्ये पाठवल्यास पाकिस्तानची शक्ती वाढेल. त्यामुळे देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘उज्जैन (मध्यप्रदेश) येथे मोहरमच्या वेळी धर्मांध युवकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवत ४ आरोपींना अटक केली. काही जणांनी या आरोपींना पाकमध्ये पाठवण्याची मागणी केली आहे.’


अंगणवाडी सेविकांना कुचकामी भ्रमणभाष संच देणे, हे सरकारला लज्जास्पद !

‘सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण अभियानाच्या अंतर्गत देण्यात आलेले भ्रमणभाष संच बिघडल्याने ते अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या उपस्थितीत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विनीत म्हात्रे यांच्याकडे परत करण्यात आले.’


कारगिल सीमेवर तुटपुंजे सैनिक तैनात करणार्‍या संरक्षण खात्याचे खरे स्वरूप जाणा !

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

‘काश्मीरची नियंत्रण रेषा ४८० किलोमीटरची असून तेथे भारताचे २ लाख सैनिक पहारा देतात; परंतु याहून दुप्पट सीमा असलेल्या कारगिल सीमेवर वर्ष १९९९ मध्ये केवळ एक ब्रिगेड म्हणजे ५ सहस्र सैनिक तैनात होते.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन