मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. वरुण शेट्टी (वय ७ वर्षे) याच्याविषयी देवाने सुचवलेली कविता !

वरुण, तुझ्या निष्पाप, निरागस, भोळ्या भावापुढे ।
साक्षात् परमेश्वरानेही हात टेकले ।।

कु. वरुण शेट्टी

‘६.२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मी मिरज येथील कु. वरुण शेट्टी याच्याविषयी त्याच्या मातोश्री सौ. राजलक्ष्मी शेट्टी यांनी लिहिलेला लेख वाचला. त्या वेळी ‘यावर काहीतरी लिहावे’, अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. त्यावर प्रथम देवाने मला शीर्षक सुचवले आणि उर्वरित भागही देवाने मजकडून लिहून घेतला. त्याने लिहून घेतलेला भाग त्याच्या चरणी शरण जाऊन समर्पित करतो.

श्री. संजय घाटगे

निर्गुण-निराकार, सगुणात साकारले ।
वरुण, तुझ्या भोळ्या भावापुढे
साक्षात् परमेश्वरानेही हात टेकले ।। धृ. ।।

तुझ्यामुळे मला बाबा (टीप १) आठवले ।
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला ।
त्यांचे पेढा भरवणे आठवले ।। १ ।।

‘आठवले’वरून आठवले (टीप २) आठवले ।
‘आठवले’ शब्दाची लीला आठवली ।
त्या लीलांमध्ये मन रंगून गेले ।
स्थळ-काळाचे भान हरपले ।। २ ।।

बालवयात वरुण तुझे खेळ आगळे-वेगळे ।
देव सगळे जणू, तुझे मित्रच झाले ।
थर्मासमध्ये शिवतत्त्व साकारले ।
काठीमध्ये तुझ्या त्रिशूळ आकारासी आले ।
तुझ्या भोळ्या भावामध्ये ध्रुवबाळाची भक्ती साकारली ।
त्या भक्तीपुढे परमेश्वराला सगुणात साकारावे लागले ।। ३ ।।

घड्याळामधील बारा आकडे ।
तुझ्यासाठी विविध देवतांच्या रूपात साकारले ।
सात वर्षांच्या बालबुद्धीचे बुद्धीवाद्यांनाही कोडे पडले ।। ४ ।।

ते बसू देत त्यांच्या अकलेचे तोडत तारे ।
भाव भोळा असतो, त्यामध्ये बुद्धी हा घटक नसतो ।
हे समजण्यातच बुद्धीवाद्यांचे आयुष्य सरेल सारे ।। ५ ।।

स्थुलातून देव शोधण्यासाठी तू ।
शिवाच्या नामपट्टीसमोर हट्ट धरून बसलास ।
जसाजसा मोठा होशील ।
तसतसे हळूहळू तुझ्या लक्षात येईल ।
देव अन् माझ्यातले अंतर कमी कमी होतेय ।। ६ ।।

एक दिवस तुझ्यातील द्वैतभाव नष्ट होईल ।
आणि ‘मीच देव आहे’, याची जाणीव तुला होईल ।
तेव्हा तुझा स्थुलातील देव शोधण्याचा प्रवास थांबेल ।
मी काय म्हणतोय, ते आज तुझ्या नीट
लक्षात येणार नाही बाळा वरुण ।
पण मला काय म्हणावयाचे आहे ।
हे तुझी आई गुरुकृपेने नीट समजावून सांगेल तुला बाळा ।। ७ ।।

टीप १ – प.पू. भक्तराज महाराज

टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. संजय घाटगे, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर. (६.२.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक