काश्मीरच्या सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पोचल्याचा संशय !

आज ना उद्या तालिबानी आतंकवादी भारतात घातपात करण्यासाठी घुसणार, हे निश्‍चित आहे. त्यापूर्वीच भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्यासाठी आक्रमण करणे आवश्यक ! – संपादक

नवी देहली – पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने तालिबानी आतंकवाद्यांना काश्मीरच्या सीमेवर पाठवल्याचे सांगितले जात आहे. पुंछ सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पहायला मिळाल्याची माहिती भारतीय सुरक्षायंत्रणांना मिळाली आहे. यामुळे भारतीय सैनिकांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.