‘दीपालीमाऊली’ करत असे आमचे आध्यात्मिक पालनपोषण ।

कु. दीपाली मतकर

सोलापूरनगरीत धावत आली हो दीपालीताई (टीप १) ।
लावी कृष्णभक्तीचा दीप आम्हा सर्वांच्या अंतःकरणी ।। १ ।।

सर्वस्व अर्पिले तिने कृष्णरूपी गुरुमाऊलींसाठी ।
गुरुमाऊलीने तिला पाठवले भवानीक्षेत्री
आमच्या उद्धारासाठी ।। २ ।।

कौतुक करूनी सर्वांचे ती प्रोत्साहन देते ।
प्रेमभावाने स्वभावदोष-अहं सांगून
प्रीती अनुभवण्यास देते ।। ३ ।।

श्री. जयेश ताटीपामूल

बोलतांना प्रत्येक शब्दातून तिच्या अंतर्मुखता दिसते ।
तिच्या प्रत्येक कृतीतून श्री गुरूंप्रती शरणागती दिसते ।। ४ ।।

रात्रंदिवस ध्यास तिला लागला हो केवळ गुरुसेवेचा ।
‘श्री गुरूंसाठी किती अन् काय करू ?’,
असा भाव असे तिचा ।। ५ ।।

श्री गुरु, सद्गुरु अन् संत यांचे ।
ती प्रत्येक प्रसंगात आज्ञापालन करते ।। ६ ।।

आम्हा साधकांची जणू ‘माऊली’ होऊन ।
करते आमचे ती आध्यात्मिक पालनपोषण ।। ७ ।।

टीप १ : ६९ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. दीपाली मतकर

– श्री. जयेश ताटीपामूल (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सोलापूर (११.८.२०२०)