प्रेमळ, कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या आणि साधनेच्या बळावर प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाणार्या सनातन संस्थेच्या ४१ व्या संत पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाईआजी (वय ९० वर्षे) !
‘आषाढ पौर्णिमा (गुरुपौर्णिमा २३.७.२०२१) या दिवशी पू. (श्रीमती) प्रमिला प्रभुदेसाई यांचा ९० वा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या स्नुषा श्रीमती माया उदय प्रभुदेसाई यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. पू. आईंचे (पू. प्रमिला प्रभुदेसाई यांचे) माहेरचे नाव ‘प्रेमा’ आहे. त्या नावाप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि सुस्वभावी आहेत.
२. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे.
३. त्यांना टापटीप आणि स्वच्छतेची आवड आहे.
४. पू. आई स्वतःची कामे वेळच्या वेळी करतात.
५. ‘वाचन करणे’ हा त्यांचा छंद आहे.
६. त्या नियमितपणे नामजप आणि पोथीवाचन करून देवाच्या अनुसंधानात रहातात.
७. पू. आई आमचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाण्याची शिकवण मिळते. त्या आम्हाला कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती देतात.
८. पू. आई माझ्या समवेत असणे, म्हणजेच ‘देवाचे वास्तव्य माझ्या घरी आहे’, असे मला वाटते. ‘एक वडीलधारी व्यक्ती आपल्या घरात असणे’, यासारखी संपत्ती नाही. त्या आमच्या कुटुंबातील दुवा आहेत.
९. त्यांनी आयुष्यात पुष्कळ दुःखे भोगली; पण केवळ ‘ईश्वरी कृपा आणि साधना’ यांमुळे त्यांनी संकटांवर मात केली.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना : पू. आईंना सनातन संस्थेने साधनेचा मार्ग दाखवला. त्यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांच्याप्रती कृतज्ञ आहे. वर्ष २०१४ मध्ये सनातन संस्थेने पू. आईंना संतपद देऊन गौरवले. ‘पू. आईंना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या कुटुंबावर राहो’, अशी मी प्रार्थना करते.’
– श्रीमती माया उदय प्रभुदेसाई (स्नुषा), पणजी, गोवा.
(२२.७.२०२१)