५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. नारायणी परेश वराडे (वय ८ वर्षे)!

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. नारायणी परेश वराडे एक आहे !

श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी, म्हणजेच गोकुळाष्टमी (३०.८.२०२१) या दिवशी नागपूर येथील कु. नारायणी परेश वराडे हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या जन्मापूर्वी आईला जाणवलेली सूत्रे आणि तिच्या जन्मानंतर आई-वडिलांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. नारायणी वराडे


कु. नारायणी परेश वराडे हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

१. जन्मापूर्वी

१ अ. सनातन संस्थेचे ग्रंथ वाचून अध्यात्माविषयी आवड निर्माण होणे आणि त्यामुळे गरोदरपणात धार्मिक ग्रंथांचे वाचन अन् नामजप करणे : ‘नारायणीच्या जन्मापूर्वी मला अध्यात्माविषयी ज्ञान नव्हते. सनातन संस्थेचे ग्रंथ माझ्या वाचनात आले. त्यानंतर माझ्यात अध्यात्माविषयी आवड निर्माण झाली. ईश्वराच्या कृपेने नारायणीच्या जन्मापूर्वी मी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप केले. मी धार्मिक ग्रंथही वाचले. सात्त्विक आचरण आणि भोजन यांचे मी काटेकोरपणे पालन केले. ‘प्रत्येक मासागणिक माझी अध्यात्माची आवड वाढत आहे’, असे मला जाणवत होते. माझी धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड वाढतच गेली. गर्भारपणात मी अनेक वेळा भगवद्गीता ऐकली.

१ आ. मंदिरात गेल्यावर ‘तेथील शांत वातावरण पोटातील बाळाला आवडत आहे’, असे मला जाणवायचे.

२. जन्म ते ३ वर्षे

२ अ. चि. नारायणी घरात एकटीच शांतपणे आणि आनंदाने खेळायची.

२ आ. उत्तम स्मरणशक्ती : आम्ही शिकवलेले तिच्या चांगले लक्षात रहाते. ३ वर्षांची असतांना ती तिच्या आजीच्या समवेत गीता शिकण्याच्या वर्गाला जायची. तेव्हा तिने पसायदान ऐकून पाठ केले होते.

२ इ. देवाची ओढ

१. ती न विसरता कृष्णाच्या चित्राला फूल वहाते.

२. नारायणीला भाद्रपद मासात गणेशोत्सवात गणपतीच्या पूजेची सिद्धता आणि सकाळ-संध्याकाळ आरती करायला फार आवडायचे. ती नित्यनेमाने त्यासाठी साहाय्य करायची.

३. तिला विविध स्तोत्रे म्हणायला आणि ऐकायला आवडतात.

२ ई. सात्त्विकतेची ओढ

१. आध्यात्मिक व्याख्यानाच्या ठिकाणी तिला घेऊन गेल्यावर ती पूर्ण व्याख्यान संपेपर्यंत ते शांतपणे ऐकते.

२. तिला भीमसेनी कापूर फार आवडतो. ती नियमितपणे कापराचे उपाय करते.

३. तिला झाडांची काळजी घ्यायला आवडते.

३. वय ४ ते ८ वर्षे

३ अ. तिला अभ्यासात रुची आहे. ती अभ्यास चांगला करते. तिच्या शाळेतील शिक्षकही ‘नारायणी शांत आहे. दंगा न करता ती तिचा अभ्यास करते’, असे सांगतात.

३ आ. घरी मिठाई किंवा चॉकलेट आणल्यावर नारायणी ते कधीही हट्टाने मागत नाही. जेव्हा मी सगळ्यांना देण्यासाठी मिठाई बाहेर काढते, तेव्हाच तिलाही देते.

३ इ. तिच्या वागण्या-बोलण्यात नम्रता दिसून येते. ती कुणाशीही हळू आवाजात आणि आदराने बोलते.

३ ई. ती तिचे साहित्य नीट ठेवते. तिला साहित्य व्यवस्थित ठेवलेले आवडते.

३ उ. तिला कुठलीही गोष्ट समजावून सांगितल्यावर नारायणी ती पटकन समजून घेते.’

– सौ. शिल्पा परेश वराडे (आई), नागपूर (६.८.२०२१)

श्री. परेश वराडे

३ ऊ. ‘तिच्यात पुष्कळ आत्मविश्वास आहे. ती बाहेर आत्मविश्वासाने वावरते.

३ ए. ती ‘स्वतःमुळे कुणाला त्रास होणार नाही’, याची नेहमी काळजी घेते.

३ ऐ. ती ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते.

३ ओ. सत्संगाची ओढ : आम्ही दळणवळण बंदीमध्ये सनातन संस्थेने चालू केलेल्या साधना सत्संगाच्या माध्यमातून सनातनशी जोडले गेलो आहोत. नारायणी साधना सत्संग ऐकते आणि सत्संगात चांगल्याप्रकारे बोलते. सत्संगाची वेळ तिच्या लक्षात असते आणि ती आम्हाला त्याची आठवण करून देते.

३ औ. स्वतःला पालटण्याची तळमळ : मी तिला स्वभावदोष-निर्मूलनाची प्रक्रिया समजावून सांगितली. तेव्हा तिने ती समजून घेतली आणि स्वयंसूचना दिल्या. मी तिला स्वतःचे काम स्वतः करण्याविषयी स्वयंसूचना द्यायला सांगितल्या होत्या. त्याप्रमाणे तिने स्वयंसूचना दिल्या. आता ती स्वतःची कामे स्वतःच करते.

४. नारायणीचे स्वभावदोष :

चिडचिडेपणा आणि राग येणे’

– श्री. परेश गणेश वराडे (वडील), नागपूर (६.८.२०२१)