|
- नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) हा मुसलमानविरोधी असल्याचे सांगत आकांडतांडव करणारे भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी पाकिस्तानातील हिंदूंच्या दैनावस्थेवर कदापि बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
- पाकमधील ईशनिंदेच्या कायद्याच्या विरोधात ‘ब्र’ही न काढणारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यास ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’चे डोस पाजतात. हिंदूंनो, या मंडळींचा हिंदुद्वेष जाणा आणि त्यांना वैध मार्गाने विरोध करा ! – संपादक
नवी देहली – काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये एका ८ वर्षीय हिंदु मुलाने तेथील मदरशामध्ये मूत्रविसर्जन केल्यामुळे त्याच्या विरोधात ईशनिंदेचा ठपका ठेवत त्याला अटक करण्यात आली होती. यामुळे पाकिस्तानातील ईशनिंदेचा जाचक कायदा पुन्हा एकदा ऐरणवीर आला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांसाठी लढणारे राहत ऑस्टिन यांनी सांगितले की, पाकमध्ये तालिबानच्या विरोधात बोलणेही ईशनिंदेसमानच झाले आहे. तेथील परिस्थिती अल्पसंख्यांकांसाठी अत्यंत बिकट झाली आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राहत ऑस्टिन यांच्याशी दूरभाषद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी पाकिस्तानातील भयावह स्थितीची माहिती दिली.
या वेळी ऑस्टिन म्हणाले, ‘‘भोंग शहरातील निष्पाप हिंदु मुलाच्या कृत्याचा आधार घेत स्थानिक शेकडो धर्मांधांनी तेथील गणपती मंदिरावर आक्रमण केले होते. मंदिराची नासधूस करत हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडण्यात आल्या होत्या. आता मात्र संबंधित मुलाच्या विरोधातील सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या विरोधातील गुन्हा रहित करण्यात आला आहे. असे असले, तरी धर्मांधांकडून संबंधित हिंदु कुटुंबाला धोका असल्याने कुटुंब अजूनही पोलिसांच्या संरक्षक कोठडीमध्ये आहे.’’
ऑस्टिन यांनी पाकमधील धर्मांधतेविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितलेली माहिती पुढे दिली आहे.
१. पाकमधील धर्मांधांना मंदिरे आणि अल्पसंख्यांक यांच्यावर आक्रमण करण्यासाठी कोणतेही निमित्त पुरेसे असते. हिंदु धर्म आणि हिंदू यांचा वंशविच्छेद करणे, हाच तेथील बहुसंख्यांकांचा एककलमी कार्यक्रम असतो. त्यामुळे पाकमधील अल्पसंख्यांकांची संख्या दिवसेंदिवस अल्प होत चालली आहे.
२. पाकमधील मंदिरांवर आक्रमण झाल्यावर हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती तोडण्यात येतात. त्यानंतर पुन्हा कधीच मूर्ती बसवण्यात येत नाहीत. मंदिरांत केवळ हिंदूंच्या देवतांची चित्रे लावून हिंदूंच्या तोंडाला पाने पुसली जातात. ‘एखाद्या महिलेचा बलात्कार केल्यानंतर तिला चांगले कपडे नेसवणे आणि तेथील भूमी स्वच्छ करणे’, यांसारखे हे झाले आहे.
३. भोंग शहराच्या झालेल्या हिंसेमुळे तेथील १५० हिंदु कुटुंबांनी पलायन केले होते. त्यातील काहीच कुटुंबे परत आली आहेत. अनेक कुटुंबे अजूनही दहशतीमुळे परतलेली नाहीत.
४. पाकमध्ये माणूस जितका शिकलेला, तितका तो अधिक कट्टर असतो. मी स्वत: अधिवक्ता असल्याने सांगू शकतो की, न्यायालयातील लिपिकापेक्षा न्यायाधीश हे अधिक कट्टर असतात आणि धर्माच्या आधारावरच विचार करतात. वर्ष २००९ पासून मी हे अनुभवत आलो आहे.