कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांचे द्वेषपूर्ण विधान !
|
मैसुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मी तालिबानशी केली होती. धर्माच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो आणि तालिबानदेखील तेच करत आहे; म्हणून मी संघाची तुलना तालिबानशी केली. भाजप आणि रा.स्व. संघ यांनी कितीही विरोध केला, तरी माझे म्हणणे मी मागे घेणार नाही, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (‘के.पी.सी.सी.’चे) कार्याध्यक्ष आर्. ध्रुवनारायण यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलतांना ध्रुवनारायण म्हणाले की, रा.स्व. संघाच्याच्या संदर्भात मी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे; कारण महिलांना संघामध्ये प्रतिनिधित्व नाही. (काँग्रेसच्या अधिवक्ता असणार्या नेत्यावर त्याने महिला अधिवक्त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे, अन्य एका नेत्याने भर सभेत स्वपक्षाच्याच महिला कार्यकर्तीविषयी बोलतांना अश्लाघ्य शब्दप्रयोग केला होता. अनेक अनेक आरोप काँग्रेसवाल्यांवर असतांना त्यांना अन्यांवर असा आरोप करण्याचा काय अधिकार ? – संपादक)
आरएसएस की तुलना तालिबान से करने वाले बयान को लेकर भाजपा, कांग्रेस कर्नाटक में आमने-सामने#BJP #Congress #RSS #HindutvaTerror #Taliban #PanjshirValley #ThirdWave #GiftOfHome #LoveIsland #BoycottMyntra #Indore #panjshirResistance #UmarKhalid #ArunJaitleyhttps://t.co/cud4cThbDL
— Dainik Bhaskar Hindi (@DBhaskarHindi) August 24, 2021