प्रवचनकारांना अपकीर्त करण्याच्या हेतूने त्यांचा भ्रमणभाष क्रमांक अश्लील गोष्टीसाठी संपर्क म्हणून सार्वजनिक ठिकाणी लिहिणारे हिंदुद्वेष्टे अन्य धर्मीय !

‘केरळमध्ये गेली काही वर्षे सनातन संस्थेशी जोडलेले एक प्रवचनकार ‘श्रीमद्भागवत’ यावर प्रवचन देत आहेत. ते प्रवचनाद्वारे हिंदु धर्मशास्त्र समजावून लोकांना धर्माचरण करण्यासाठी प्रवृत्त करतात. ते सनातन संस्थेच्या कार्याविषयी त्यांच्या प्रवचनांतून माहिती सांगतात. त्यांनी स्वत:च्या संदर्भात घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला.

काही दिवसांपूर्वी त्यांना भ्रमणभाषवर अचानक पुष्कळ संपर्क (कॉल) येऊ लागले. वारंवार संपर्क यायला लागल्यावर त्यांनी थोड्या वेळाने तो संपर्क स्वीकारला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने सांगितले, ‘‘एका जिल्ह्यात एका मंदिराच्या शेजारील फलकावर २ भ्रमणभाष क्रमांक आणि एका गाडीचा क्रमांक लिहिण्यात आला आहे. त्यावर ‘या क्रमांकावर संपर्क केल्यास तुम्हाला आवश्यक गाडी आणि बाई कुठे मिळू शकते, ते कळेल’, असे लिहिण्यात आले होते.’’ या लिखाणामध्ये एक भ्रमणभाष क्रमांक चुकीचा होता; पण दुसरा क्रमांक या प्रवचनकारांचा होता. यावरून ‘धर्मप्रचार करतांना एखाद्याने स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक दिल्यावर इतर पंथीय आणि साम्यवादी आपल्याविषयी अपप्रचार करण्यासाठी कसा दुरुपयोग करतात’, असे लक्षात आले. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक अन्य कुणालाही देतांना त्याचा दुरुपयोग होणार नाही, यादृष्टीने सतर्क रहायला हवे.’

– श्री. नंदकुमार कैमल, केरळ (२३.८.२०२१)