उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ओवी रवींद्र पेडणेकर एक आहे !
मूळची गडहिंग्लज येथील आणि आता लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे रहाणारी चि. ओवी रवींद्र पेडणेकर हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे, तसेच जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली काही सूत्रे २३.८.२०२१ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
३. वय ७ ते ९ मास
३ अ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता
१. आश्रमातील एका आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केल्यावर ती रडली; मात्र त्रास नसलेल्या अन्य एका साधिकेने घेतल्यावर ती शांतपणे तिच्याकडे गेली.
२. कु. ओवीने सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना स्वत:हून नमस्कार करणे : एकदा पनवेल येथे सद्गुरु अनुताईंनी (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी) साधकांसाठी साधना शिबिर घेतले होते. त्या शिबिरासाठी मी ओवीला घेऊन गेले होते. सद्गुरु अनुताई समोर आल्यानंतर ओवीने स्वतःहून त्यांना नमस्कार केला. त्यानंतर तिने स्वतःहून त्यांच्याकडे झेप घेतली. यापूर्वी ती पहिल्या भेटीत असे कुणाकडेच गेली नव्हती.
३ आ. साधना शिबिराच्या दुसर्या सत्रात पू. जाधवकाकू (पू. (सौ.) संगीता जाधव) मार्गदर्शन करत असतांना ओवी शांतपणे एकटीच खेळत होती.
३ इ. आई सेवेला गेल्यावर अन्य साधकांकडे शांतपणे रहाणे : खिडूकपाडा येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या बैठकांसाठी मला ओवीला समवेत घेऊन रात्रीच्या वेळी जावे लागायचे. त्या वेळी ओवी कधीही रडली नाही किंवा तिने कुठलाही त्रास दिला नाही. सभेच्या दिवशीही ती पूर्ण दिवसभर अन्य साधकांकडे शांतपणे राहिल्यामुळे आम्हाला झोकून देऊन सेवा करता आली.’
– सौ. रेवती पेडणेकर (१४.८.२०२०)
४. वय १० मास ते १ वर्ष ४ मास
४ अ. श्रीकृष्णाच्या चित्राशी बोलण्याचा प्रयत्न करणे : ‘ओवीला खोलीत लावलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राचे बरेच आकर्षण आहे. तिला मी कडेवर घेऊन त्या चित्राकडे गेल्यास ती त्या चित्रावर हात फिरवत श्रीकृष्णाशी बोलल्याप्रमाणे आवाज करते. ती रडत असतांना त्या चित्राकडे नेल्यावर शांत होते.’
– श्री. रवींद्र पेडणेकर (१४.८.२०२०)
४ आ. रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून स्वतःहून ‘बाप्पा, बाप्पा’, असे म्हणणे आणि रामनाथी आश्रमात गेल्यावर प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र दाखवल्यावर ‘बाप्पा, बाप्पा’ असे म्हणणे : ‘१४.३.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात येण्याच्या २ दिवस आधीपासून ओवी श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून स्वतःहून ‘बाप्पा, बाप्पा’, असे म्हणायला लागली. मी तिला प.पू. गुरुदेवांची ओळख ‘प.पू. आजोबा’ अशी करून दिली होती. रामनाथी आश्रमात एका साधिकेने ओवीला प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा ती त्यांना बघून सारखी ‘बाप्पा, बाप्पा’ असे म्हणायला लागली.’ – सौ. रेवती पेडणेकर (१४.८.२०२०)
४ इ. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर अनेक साधकांनी ओवीचे डोळे पाणीदार असल्याचे सांगितले.’ – श्री. रवींद्र पेडणेकर (१४.८.२०२०)
४ ई. ‘ओवीच्या डोळ्यांकडे पाहून ‘ती आतून शांत आणि स्थिर आहे’, असे जाणवते.’ – सौ. अभया उपाध्ये, कामोठे, रायगड.
५. स्वभावदोष : हट्टीपणा
– सौ. रेवती पेडणेकर, पनवेल (१४.८.२०२०) (समाप्त)
चि. ओवीला होत असलेल्या त्रासांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय
अ. कुठेही बाहेर जाऊन आल्यावर ओवीला दृष्ट लागत असणे, एकदा तुरटीच्या खड्याने तिची दृष्ट काढल्यावर तुरटी भूमीलगत पसरण्याऐवजी काठीसारखी फुलून वर येणे आणि दृष्ट काढल्यावर ओवी शांत होणे : ‘कुठेही बाहेर जाऊन आल्यावर किंवा पुष्कळ लोकांमध्ये जाऊन आल्यावर त्या रात्री ओवी पुष्कळ रडते. तिला शांत झोप लागत नाही. अशाच एका प्रसंगात ओवीची तुरटीच्या खड्याने दृष्ट काढली. तेव्हा तुरटी भूमीलगत पसरण्याऐवजी काठीसारखी फुलून वर आली. तिच्याकडे बघूनही भीती वाटत होती. दृष्ट काढल्यावर ओवी लगेच शांत झाली. कधी मीठ-मोहरीने किंवा कापराने दृष्ट काढल्यास ती लगेच शांत होते. तिला अशी दृष्ट नेहमीच लागत असल्याचे लक्षात आले.
आ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी घेतल्यावर रडणे : ओवीच्या नामकरण विधीला पू. अश्विनीताई (पू. (सौ.) अश्विनी पवार) आल्या होत्या. तेव्हा त्यांनी ओवीला घेताच ओवी रडायला लागली. असेच पुनःपुन्हा झाले. तेव्हा पू. ताई म्हणाल्या, ‘‘तिला अनिष्ट शक्तींचा त्रास आहे. तिची नेहमीच दृष्ट काढत जा.’’
– सौ. रेवती पेडणेकर (१४.८.२०२०)
चि. ओवी हिच्यासाठी करावयाचे उपाय
१. नामजपाचे उपाय
‘न्यास : हाताचा तळवा आज्ञाचक्रावर ठेवणे
नामजप : महाशून्य
कालावधी : २ घंटे प्रतिदिन
ओवीसाठीचे हे उपाय आई-वडिलांपैकी कुणीही करू शकतो. त्यांनी स्वतःच्या आज्ञाचक्रावर न्यास करत उपाय करावेत.
शक्य असल्यास तिच्या आज्ञाचक्रावर ‘महाशून्य’ या नामजपाची पट्टी लावावी. तसे शक्य नसल्यास तिच्या तोंडवळ्याचे छायाचित्र काढून त्या छायाचित्रातील तिच्या कपाळावर ‘महाशून्य’ या नामजपाची पट्टी लावावी. तिचे मागून छायाचित्र काढून डोक्याच्या मागच्या भागावरही नामजपाची पट्टी लावावी. नामजपाची पट्टी शरिराला स्पर्श करून लावतांना ‘नामजपाची अक्षरे असलेला भाग बाहेरच्या दिशेने (निर्गुण) येईल’, अशा प्रकारे लावावी.
२. ओवीला बाहेर घेऊन जातांना आणि बाहेरून आल्यावर घ्यायची काळजी
अ. बाहेर जाण्यापूर्वी तिच्यासाठी वर दिलेले नामजपादी उपाय शक्यतो पूर्ण करावेत.
आ. दृष्ट लागू नये म्हणून तिचा गाल, मस्तक, तळपाय आणि तळहात यांना काजळाचा ठिपका लावावा. यामुळे तिच्या सर्व देहाचे रक्षण होईल.
इ. बाहेरून घरी आल्यावर तिचे हात, पाय आणि तोंड पाण्याने धुवावे.
ई. त्यानंतर तिची मीठ-मोहरी यांनी दृष्ट काढावी. (अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी तिची घरी असतांनाही सायंकाळी दृष्ट काढावी.)
३. घरात श्रीकृष्णाचा नामजप तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात लावून ठेवावा. तसेच मधे मधे प.पू. भक्तराज महाराजांची भजने, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन, शक्तीस्तवन असेही लावू शकतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२०)