भाषेतील अक्षरांची संख्या आणि त्यांचे उच्चार अन् संस्कृत भाषेचे महत्त्व

२२ ऑगस्ट या दिवशी संस्कृतदिन झाला. त्यानिमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. अक्षराचा उच्चार (शब्द) आणि लिखाणातील आकार (रूप) योग्य असेल, तर स्पर्श, रस अन् गंध या तीनही घटकांची सूक्ष्मातील अनुभूती येणे 

‘शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे एकमेकांशी जोडलेले असतात’, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्याचा अर्थ आहे, ‘शब्द’ म्हणजे ‘अक्षराचा उच्चार.’ ‘स्पर्श’ म्हणजे ‘स्पर्शेंद्रियांमुळे होणारे ज्ञान’, ‘रूप’ म्हणजे ‘लिखित अक्षराचा आकार.’ ‘रस’ म्हणजे अक्षराशी संबंधित चव. ‘गंध’ म्हणजे अक्षराशी संबंधित सूक्ष्म गंध. उच्चार आणि लिखाणातील अक्षराचा आकार हे दोन घटक योग्य असले, तर स्पर्श, रस आणि गंध या तीनही घटकांची सूक्ष्मातील अनुभूती येते.

२. संस्कृत भाषेत उच्चार (शब्द) आणि अक्षरांचे लिखाण (रूप) योग्य असण्याला महत्त्व दिल्यामुळे इतर भाषांच्या तुलनेत तिच्यातून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होणे, तसेच स्पर्श, रस अन् गंध यांची अनुभूती येणे 

या पाच घटकांपैकी ‘शब्द’ म्हणजे ‘अक्षराचा उच्चार’ आणि ‘रूप’ म्हणजे ‘लिखित अक्षराचा आकार’ हे दोन घटक स्थुलातील आहेत, तर ‘स्पर्श’ म्हणजे ‘स्पर्शेंद्रियांमुळे होणारे ज्ञान’, ‘रस’ म्हणजे अक्षराशी संबंधित चव आणि ‘गंध’ म्हणजे अक्षराशी संबंधित सूक्ष्म गंध. हे सूक्ष्माशी संबंधित आहेत. ‘शब्द’ म्हणजे अक्षराचा उच्चार आणि ‘रूप’ म्हणजे लिखित अक्षराचा आकार हे स्थुलातील असल्यामुळे अक्षराचा उच्चार आणि आकार हे योग्य असण्याचा मानव प्रयत्न करू शकतो. यासाठी संस्कृत भाषेत योग्य उच्चार आणि अक्षरांचे लिखाण यांना अतिशय महत्त्व आहे. संस्कृत भाषेत हे दोन्ही योग्य असल्यामुळे इतर भाषांच्या तुलनेत संस्कृत भाषेतील बोलणे आणि लिखाण यांतून सर्वाधिक चैतन्य आणि ‘स्पर्श’, ‘रस’ अन् ‘गंध’ यांची अनुभूती  येते.

३. सर्वांत अधिक परिणामकारक उच्चार आणि लिखाण संस्कृत भाषेत ५२ अक्षरांत साध्य केले असणे

तसे पाहिले, तर प्रत्येक अक्षराचा उच्चार अनेक प्रकारे करता येतो आणि त्याचे लिखाणही अनेक प्रकारे करता येते. असे असले, तरी सर्वांत अधिक परिणामकारक उच्चार आणि लिखाण संस्कृत भाषेत ५२ अक्षरांत साध्य केले आहे. हिंदी आणि मराठी भाषांत तीच अक्षरे आहेत; म्हणून त्याही परिणामकारक आहेत. याउलट काही इतर भाषांत विविध संख्येने अक्षरे आहेत.

३ अ. संस्कृत, तसेच अन्य भाषांतील अक्षरसंख्या

टीप – चिनी भाषेत अक्षरे (वर्ण) नसतात, तर खुणा/चित्रे असतात. चिनी भाषा मुळाक्षरांमध्ये लिहिली जाईल एवढी समृद्ध नाही. ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात चिनी भाषेत २ – ३ सहस्र खुणा (चित्रमय शब्द) होत्या, तर ख्रिस्तपूर्व दहाव्या शतकात चिनी भाषेत ४४ सहस्र खुणा (चित्रमय शब्द) होत्या. आधुनिक काळात ७ – ८ सहस्र खुणा येणारी चिनी व्यक्ती सुशिक्षित समजली जाते. तेथे बोलीभाषा आणि लिहिण्याची भाषा (लिपी) निरनिराळी आहे.

(संदर्भ : संकेतस्थळ ‘मराठी विश्वकोश’)

३ आ. संस्कृत (देवनागरी) आणि अन्य भाषा यांच्यात केल्या जाणार्‍या उच्चारांतील भेद

१. संस्कृत (देवनागरी) भाषेत जसे अक्षर (वर्ण) असेल, तसाच त्याचा उच्चार केला जातो. त्यामुळे जेथे जोडाक्षर असेल, तेथेही दोन्ही अक्षरांचा उच्चार केला जातो, उदा. ‘सूक्ष्म’ या शब्दातील ‘क्ष’ या अक्षराचा ‘क्ष्’ असा अर्धा उच्चार आणि ‘म’ या अक्षराचा पूर्ण उच्चार केला जातो. त्यामुळे शब्दामध्ये जेवढी अक्षरे (वर्ण) असतील, त्या सगळ्यांचा उच्चार केला लागतो.

२. याउलट अन्य भाषांत, उदा. इंग्रजी भाषेतील ‘W’ या अक्षराचा उच्चार करतांना ‘डब्ल्यु’ असा, म्हणजे देवनागरीतील चार अक्षरे मिळून (डब्ल्यु ) होणार्‍या जोडाक्षराचा उच्चार करावा लागतो. याचा दुसरा भाग, म्हणजे इंग्रजी लिपीत लिहितांना ‘W’ असे एकच अक्षर असले, तरी प्रत्यक्षात ‘W’ या अक्षरापासून आरंभ होणार्‍या शब्दांचा उच्चार करतांना देवनागरी भाषेतील ‘व’ या अक्षराच्या (वर्णाच्या) उच्चाराने प्रारंभ होतो. इंग्रजी भाषेत हा प्रकार ठायी ठायी आढळून येतो. यामुळे इतर भाषांत बोलल्यास किंवा लिहिल्यास ‘स्पर्श’, ‘रस’ आणि ‘गंध’ यांच्या अनुभूती बहुदा येत नाहीत.

यावरून लक्षात येते की, संस्कृत भाषा आणि लिपी या दोन्हींत साम्य असल्याने जशी अक्षरे असतील, तसाच त्यांच्यापासून निर्माण झालेल्या शब्दांचा उच्चार होत असल्याने ही भाषा लाखो वर्षे टिकून आहे. मराठी आणि हिंदी या देवनागरी भाषांचेही हेच वैशिष्ट्य आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले