प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
वर्तमानकाळात काही न करणार्या पोलिसांच्या भविष्यकाळातील आश्वासनावर कोण विश्वास ठेवील ?
‘गेल्या अनेक दिवसांपासून काही समाजविरोधी घटक येथील नवसह्याद्री, कर्वेनगर आणि देवेश चौक (पुणे) या परिसरांत रस्त्यांवरील भिंतींवर ब्राह्मण समाजाच्या विरोधात लिखाण करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्या जागेवरील ब्राह्मणविरोधी लिखाण त्वरित पुसले आणि भविष्यात अशा गोष्टींना आळा घालण्याचे, तसेच त्यावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले.’
खुनाच्या आरोपात निरपराध्यांना गुंतवणार्या आणि अपकीर्त करणार्या पोलिसांना कारागृहात टाका !
‘धर्मांध तरुणाशी विवाह लावून देण्यास नकार दिल्याने हिंदु मुलीने स्वत:च्याच वडिलांच्या हत्येत धर्मांध प्रियकराला साहाय्य केल्याची घटना वाराणसी येथे घडली आहे. ही हत्या ‘प्रॉपर्टी’च्या (संपत्तीच्या) वादातून झाली असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे त्यांनी मृतकाचा भाऊ आणि दोन पुतणे अशा तिघांच्या विरोधात प्रकरणाची नोंद केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे अधिक खोलात जाऊन अन्वेषण केले. तेव्हा त्यांना हत्येमागील खर्या सूत्रधारांपर्यंत पोचता आले आणि त्यातूनच जायस्वाल यांची मुलगी, तिचा धर्मांध प्रियकर जावेद आणि त्याचा मित्र आकीब यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.’
भिंतींवरील ब्राह्मण समाजाच्या विरोधातील लिखाण तक्रार केल्यावरच पोलिसांना दिसणे !
‘काही समाजविरोधी घटक पुणे येथील नवसह्याद्री, कर्वेनगर आणि देवेश चौक या परिसरांत रस्त्यांवरील भिंतींवर ब्राह्मण समाजाच्या विरोधात लिखाण करत असल्याचे आढळून आले. यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्या जागेवरील ब्राह्मणविरोधी लिखाण त्वरित पुसले.’