भारतियांनो, चिनी राख्यांवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !

गेल्या अनेक दशकांपासून चीन भारताचा शत्रू राहिलेला आहे. सीमेवरही त्याच्या कुरापती प्रतिदिन चालूच असतात. गलवान खोर्‍यात आक्रमण करून चीनने भारतीय सैनिकांना ठार केले. आतातर अफगाणिस्तानमध्ये सत्ता कह्यात घेणार्‍या तालिबानलाही चीनने पाठिंबा जाहीर केला आहे. यावरूनच चीनचे राष्ट्रद्रोही आणि घातक मनसुबे लक्षात येतात. हे लक्षात घेता चीनला आपण योग्य प्रत्युत्तर द्यायला हवे.

रविवारी २२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. भारत ही चीनची मोठी बाजारपेठ आहे. जर आपण चिनी राख्या विकत घेण्यास प्राधान्य दिले, तर भारतातील पैसा शेवटी चीनमध्येच जाणार आहे. भारतातून मिळणार्‍या पैशांचा वापर चीन पुन्हा भारतावर आक्रमण करण्यासाठी करू शकतो. हे भीषण वास्तव लक्षात घ्या आणि राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून चिनी राख्यांवर बहिष्कार घाला !