यंदा २०२१ च्या जनगणनेत सर्व समुदायांच्या लोकसंख्येचे चित्र स्पष्ट होईलच; मात्र आज देशात ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ येण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकत्याच झालेल्या बंगालमधील निवडणुका आणि त्यानंतर झालेला हिंसाचार यांमुळे तेथील हिंदूंनी जिवाच्या भीतीने पलायन केले. ‘बंगालमधील काही भाग माओवाद्यांपेक्षाही धोकादायक आहे’, असे घोषित करायला हवे. येथे सुरक्षा वाढवणे, निर्बंध लादणे अशा उपाययोजना करायला हव्यात. दंगलींचे योग्य पद्धतीने अन्वेषण करून दोषी असलेल्या सरकारी अधिकार्यांसह सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. हिंदूंचे पलायन का होत आहे ? याची केंद्र सरकारने कारणे शोधून ठोस पावले उचलायला हवीत. भारताने अन्य देशांकडून शिकून हिंदूंच्या विस्थापनाची समस्या सोडवण्यासाठी कायदे करायला हवेत.