श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींकडून पुरामुळे अडकलेल्या वाहनचालकांना अल्पाहार आणि भोजन !

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अडकलेल्या वाहनचालकांची चौकशी करतांना पू. प्राणलिंग स्वामीजी

बेळगाव, २४ जुलै (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावर यमगर्णीजवळ पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे. यामुळे शेकडो गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. ही गोष्ट श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींना कळताच त्यांनी ५०० वाहनचालकांना अल्पाहार दिला, तसेच त्यांनी विचारपूस केली.

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अडकलेल्या वाहनचालकांची चौकशी करतांना पू. प्राणलिंग स्वामीजी

यानंतर वाहनचालकांनी त्यांना भोजन नसल्याचे सांगितल्यावर स्वामीजींनी १ सहस्र लोकांच्या भोजनाची सोय केली. या सेवेसाठी समाधी मठाचे भक्तगण उपस्थित होते.