सांगली, २४ जुलै (वार्ता.) – रामनगर, भारतनगर, काळीवाट परिसर, कोल्हापूर रस्ता परिसरातील पूरग्रस्त लोकांची रहाण्याची व्यवस्था शाळा क्रमांक २७ येथे अमित भोसले, सुजित राऊत, राजू जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.
या स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना भाजपचे संघटक सरचिटणीस दीपक माने, माजी आमदार नितीन शिंदे, तसेच अन्य कार्यकर्ते यांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली, तसेच त्यांना लागणारे साहाय्य केले जात आहे.