कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसतांनाही प्रमाणपत्र मिळाले !

  • पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट

  • तांत्रिक घोळ कि अपप्रकार, याची चौकशी चालू

मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नसतांनाही कांदिवलीतील खासगी रुग्णालयांमधून लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

नीलेश मेस्त्री यांनी १४ जुलै या दिवशी कांदिवलीतील डहाणूकरवाडी येथील चव्हाण रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीसाठी ‘कोविन ॲप’वर नोंदणी केली होती. दुसर्‍या दिवशी त्यांना लस घेण्यास न जमल्याने त्यांनी पुन्हा नोंदणीसाठी ‘कोविन’ चालू केले. त्या वेळी संबंधित रुग्णालयातून त्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र त्यावर दिसले. या प्रकरणी त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. आणखी एका खासगी रुणालयाविषयी अशीच एक तक्रार आली आहे. ‘कोविन’मधील तांत्रिक घोळामुळे हे घडले आहे कि हा अपप्रकार आहे, याविषयी आम्ही पडताळणी करत आहोत’, असे पोलिसांनी सांगितले आहे.