‘व्हॉट्सअ‍ॅप’कडून एका मासात भारतातील २० लाख अकाऊंट्स बंद !

नवी देहली – केंद्रशासनाच्या नव्या ‘माहिती तंत्रज्ञान’ कायद्याच्या अंतर्गत मासिक अहवाल सादर करण्याच्या नियमानुसार ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने भारतात त्याचा पहिला मासिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपने १५ मे ते १५ जून २०२१ या काळात विविध कारणांतर्गत भारतातील २० लाख अकाऊंट्सवर बंदी घातली आहे.

जगभरात हा आकडा ८० लाख आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने म्हटले आहे की, १५ मे ते १५ जूनपर्यंत त्यांच्याकडे ३४५ तक्रारी आल्या. यांतील ६३ अकाऊंट्सच्या बंदीच्या तक्रारीवर आस्थापनाने कारवाई केली.