तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? या संशोधनालाही ते आता चुकीचे ठरवणार का ?
आपल्या आठवणी केवळ मेंदू हा अवयवच साठवत नाही, तर आपल्या आठवणी हृदयासारख्या शरिराच्या अवयवांमध्ये आणि ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) साठवल्या जातात, यावर आपला कदाचित् विश्वास बसणार नाही; पण हृदयाचे प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांच्या संदर्भात अशी काही वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे आढळून आली आहेत.
अवयवदान देणार्या व्यक्तीला आवडणारे पदार्थ ते प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीला आवडणे
क्लेअर सिल्विया हे एक सुपरिचित प्रकरण आहे. क्लेअर यांनी वर्ष १९८८ मध्ये हृदय आणि फुफ्फुस यांचे प्रत्यारोपण केले होते. त्यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘अ चेंज ऑफ हार्ट’ या पुस्तकामध्ये या शस्त्रक्रियेचे वर्णन केले आहे. त्यांनी सांगितले की, हृदय आणि फुफ्फुस यांचे प्रत्यारोपण केल्यानंतर त्यांना बिअर पिण्याची आणि कोंबडीचे सर्व प्रकारचे जंक फूड (विरुद्ध अन्न) खाण्याची तीव्र इच्छा व्हायला लागली. त्यांची शस्त्रक्रिया होण्यापूर्वी या गोेष्टी त्यांना कधीही आवडायच्या नाहीत. तसेच त्यांना एका मुलाचे चुंबन घेत असल्याची स्वप्नेही पडायची. ज्याला त्यांनी टीम एल्. असे नाव दिले होते. तोपर्यंत सिल्विया यांना त्यांच्या अवयवदान देणार्या दात्याविषयी काहीच माहिती नव्हती. वर्ष १९९० नंतर त्यांना एका प्रकाशनामधून अवयव देणगीदारांचा परिचय मिळाला. त्यामधून त्यांना अवयव देणारा १८ वर्षांचा टिम लमिरंडे असल्याचे समजले. टिम लमिरंडेच्या कुटुंबाने याची पुष्टी केली की, त्याला चिकन आणि बिअर या गोेष्टी आवडायच्या.
अवयवदान करणार्या व्यक्तीप्रमाणे आत्महत्या करणारा जॉर्जिया येथील सनी ग्रॅहम !
अशाच प्रकारचे आणखी एक चांगले उदाहरण म्हणजे जॉर्जिया येथील सनी ग्रॅहम यांचे आहे. ग्रॅहम हा त्याला अवयवदान देणार्या दात्याच्याच बायकोच्या प्रेमात पडला होता. पुढे त्याचे तिच्याशी लग्न झाल्यानंतर १२ वर्षांनी ग्रॅहमने स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली. तशीच आत्महत्या त्याच्या दात्यानेही केली होती.
प्रत्यारोपणाच्या १० प्रकरणांमध्ये देणगीदाराच्या आठवणी येत असल्याचे एका अभ्यासात आढळणे
हवाई विद्यापिठाचे डॉ. पॉल पेयर्सल यांच्या नेतृत्वात एक अभ्यास करण्यात आला. त्यांनी हृदय किंवा हृदय-फुफ्फुस यांचे प्रत्यारोपण करण्यात आलेल्या १० प्रकरणांचे दस्तऐवजीकरण केले. ज्यात अवयवांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणार्यांनी त्यांच्या देणगीदारांची व्यक्तीमत्त्वे दर्शवली आहेत. या देणगीदारांनाही देणगीदाराच्या आठवणी येण्यासंबंधीचा अनुभव आहे.
प्राध्यापक बेन यांना हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर स्वप्नात प्रकाशाचा झोत दिसणे आणि ते स्वप्न अवयवदान देणार्याशी संबंधित असणे
हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर ‘कोलाज’चे प्राध्यापक बेन यांना अनेकदा विचित्र स्वप्ने पडायची. स्वप्नात त्यांना त्यांच्या चेहर्यामध्ये प्रकाशाची एक चमक दिसली आणि त्यांचा तोंडवळा जळत असल्यासारखे वाटले. याविषयी त्यांनी कोणत्याही आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) सांगितले नाही. एकदा त्यांची पत्नी कॅसी या बेन यांच्या अवयवदान देणार्याच्या पत्नीला भेटल्या. तेव्हा त्यांनी सहजपणे या स्वप्नाचा उल्लेख केला. ते ऐकून अवयवदान देणार्याच्या बायकोला धक्का बसला; कारण मृत्यूच्या वेळी तिच्या पतीच्या तोंडावर गोळी लागली होती आणि कदाचित् प्रकाशाचा झोत ही त्यांने पाहिलेली शेवटची गोष्ट होती.
अवयवदात्याच्या आठवणी ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) साठवल्या जाणे
संशोधकांच्या मते या विचित्र घटनांमागे ‘सेल्युलर मेमरी’ (स्मृती पेशी) हे कारण आहे; कारण अवयवदान देणार्याच्या आठवणी दान केलेल्या अवयवाच्या ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) साठवल्या जातात आणि या स्मृती अतीसंवेदनशील असतात. हृदयाचे प्रत्यारोपण करणार्या प्रत्येकालाच या आठवणी होतील, असे नाही. तरीही हे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते आणि याविषयी ते अधिक संशोधन करत आहेत.
(साभार : यू ट्यूब)