केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा अभिप्राय
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने होणारा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृतमहोत्सवी सन्मान सोहळा, म्हणजे गोमंतकियांसाठी एक पर्वणीच आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रसार आणि संरक्षण करणे, हे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज अन् सनातन संस्था या दोघांच्या कार्यातील साधर्म्य आहे. ‘हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान समाजात रूजवणे, धर्माचरणाला महत्त्व देणे आणि आध्यात्मिक साधनेद्वारे व्यक्ती अन् समाज यांचा विकास करणे’, हा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज अन् सनातन संस्था या दोघांचाही उद्देश आहे. महोत्सवाला उपस्थित असणे, म्हणजे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि सनातन संस्था या दोघांच्या उच्चतम राष्ट्रकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे होय !