कोविड केंद्रामध्ये भेदभाव करणारे राजस्थान सरकार ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित

राजस्थानमध्ये केवळ लसीकरणामध्ये नव्हे, तर कोविड केंद्रामधील रुग्णांशीही भेदभाव केला गेला. राजस्थान सरकारने गेल्या वर्षी रमझानच्या काळात एक आदेश काढला की, रमझान मासामध्ये कोविड केंद्रामधील मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार वेगळे अन्न देण्यात यावे. एका कोविड केंद्रामध्ये हिंदूंची २ मुले बाधित होती. त्यांनी खाण्यासाठी केळी मागितली, तेव्हा प्रशासनाने त्यांना २ केळी दिली नाहीत; पण सरकार मुसलमानांना प्रतिदिन १ डझन केळी देत होते. जेव्हा ही गोष्ट समोर आली, तेव्हा ती हिंदू मुले उच्च न्यायालयात गेली. त्या वेळी सरकारला नाईलाजाने तो आदेश रहित करावा लागला. जे लोक नागरिक नाहीत, अशा घुसखोरांना विशेष वागणूक दिली जाते; पण जे लोक अधिकृतरित्या शरण आले आहेत, त्यांच्याशी हे सरकार भेदभाव करत आहे.