राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ६.७.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

पुढे रावणाची मंदिरे बांधल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे हिंदू नाश पावल्यास आश्चर्य वाटणार नाही !

‘प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथील शुक्लपूर गावात ५ दिवसांपूर्वी बांधण्यात आलेले ‘कोरोनामाता मंदिर’ अज्ञातांकडून पाडण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, हे मंदिर वादग्रस्त भूमीवर असल्यामुळे ज्यांच्यामध्ये वाद आहे, त्यांच्यापैकीच कुणीतरी पाडले आहे. मंदिर लोकवर्गणीतून लोकेश यांनी ५ दिवसांपूर्वीच बांधले होते, तसेच या मंदिरात ‘कोरोनामाते’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.’


हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गूगल मॅप’वर नगर (महाराष्ट्र) येथील ‘पॉटींजर रोड’ या ठिकाणाचे नाव ‘औरंगजेब रोड’ असे दाखवले जात आहे. हा भाग भिंगार सैनिकी छावणी परिषदेच्या सीमेत येतो. या भागात सैन्याचे गोपनीयतेसह सुरक्षेविषयीचे नियम लागू आहेत. या रस्त्यावर सैनिकी अधिकार्‍यांचे जुने बंगले आहेत. पूर्वी इंग्रज अधिकार्‍याच्या नावावरून या भागाला ‘पॉटींजर रोड’ हे नाव देण्यात आले होते.’


या संदर्भात शिवभक्त काय करतात कि ते खरे शिवभक्तच नाहीत ?

(प्रातिनिधिक छायाचित्र)

‘भाग्यनगर (तेलंगाणा) येथील कृतिका गौरा आणि चित्तीन मट्टा यांनी इन्स्टाग्रामवरून प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये हिंदु देवतांचा अश्लील भाषेत अवमान करण्यात आला आहे. या दोघांनी त्यांच्या व्हिडिओत ‘भगवान शिव यांनी स्वतःचे गुप्तांग कापले’, असे लिहिले आहे. अन्य एका घटनेत सामाजिक माध्यम ‘इन्स्टाग्राम’ने भगवान शिवाचे आक्षेपार्ह ‘स्टिकर’ प्रसारित केले आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने देहलीतील धर्माभिमानी मनीष सिंह यांनी इन्स्टाग्रामच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.’


रामजन्मभूमी खरेदीमध्ये केला जाणारा घोटाळ्याचा आरोप हे केवळ निमित्त असून त्याद्वारे राममंदिर उभारणीचे कार्य थांबवणे, हाच समाजकंटकांचा उद्देश ! – कार्तिक साळुंके, देहली राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

कार्तिक साळुंके

न्यायालयाचा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागल्यानंतर श्रीराममंदिर उभारणीचे कार्य चांगल्या प्रकारे चालले आहे; मात्र त्यात बाधा आणण्याचा काही समाजकंटकांचा अजेंडा (धोरण) आहे. हा हिंदुविरोधी प्रचाराचा एक भाग आहे. रामजन्मभूमी खरेदीमध्ये केला जाणारा घोटाळ्याचा आरोप हे केवळ निमित्त असून मंदिर उभारणीचे कार्य थांबवणे, हाच समाजकंटकांचा उद्देश आहे.

मंदिर उभारणीचे कार्य थांबवू पहाणारे आणि जनतेला भरकटवणारे यांची एक टोळीच सध्या कार्यरत आहे. ज्यांनी आयुष्यभर श्रीराममंदिराच्या उभारणीला विरोध करत अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले, अशांना आरोप करण्याचा काय अधिकार ?


बांधकामे अनधिकृत असूनही ती ३ वर्षे का ठेवली ? सरकारी जागेत अनधिकृत दुकाने उभारली जात असतांना संबंधित सरकारी यंत्रणा काय करत होती ? कृती न करणार्‍या पोलिसांवर आणि उत्तरदायींवर तात्काळ कारवाई करा !

(प्रातिनिधिक छायाचित्र)

‘बांबोळी (गोवा) येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सुमारे १७ अनधिकृत दुकाने पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोझरच्या साहाय्याने नुकतीच पाडण्यात आली. उपजिल्हाधिकार्‍यांनी वर्ष २०१८ च्या एका आदेशाचा संदर्भ देऊन दुकानमालक आणि विक्रेते यांना सरकारी मालमत्ता तात्काळ रिकामी करण्याचा आदेश दिला होता.’


पावसाळा चालू असतांना हा आदेश देता येईल का ?

‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील तिलारी नदीवर मणेरी येथील बंधार्‍यापासून मणेरी पुलापर्यंत दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत उभारण्याचा आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावा, या मागणीचे निवेदन पंचायत समिती सदस्य धनश्री गवस यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना दिले होते. या निवेदनाची नोंद घेऊन आमदार केसरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांना ‘मणेरी येथे सरंक्षक भिंत बांधण्याविषयी आदेश निर्गमित करावा’, अशी सूचना एका पत्राद्वारे केली आहे.’