राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ५.७.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

भ्रष्टाचारी पोलीस !

‘म्हापसा (गोवा) येथील पोलीस ठाण्यातील ‘आय.आर्.बी.’ विभागातील पोलीस शिपाई आत्माराम आरोसकर यांनी दंडाचे पैसे वैयक्तिक खात्यात ‘गूगल पे’द्वारे (भ्रमणभाष अथवा संगणक यांद्वारे पैसे हस्तांतर करण्याचे ॲप) भरण्यास लावल्याचे उघड झाल्यानंतर येथे खळबळ माजली आहे. संबंधित पोलीस शिपायावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.’


भक्तांमध्ये धमक असती, तर त्यांनी मंदिरे सरकारच्या कह्यात दिली नसती. मशिदी सरकारच्या कह्यात नसतात, तसेच मंदिरांचेही झाले असते !

‘कायद्याच्या हिशोबाने मंदिरातील मूर्ती एका लहान मुलाप्रमाणे आहेत. लहान मुलांच्या संपत्तीचे रक्षण न्यायालयानेच करायला हवे, असे मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या भूमीवरील वादाविषयीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी म्हटले. हिंदूंची मंदिरे आणि त्यांची संपत्ती यांच्या रक्षणासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात द्यावीत, अशी मागणी हिंदूंकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हे मत महत्त्वाचे मानले जात आहे.’


४८२ शाळांवर शिक्षक आणि शिपाई यांचे वेतन, इमारतींवरील व्यय उत्तरदायींकडून वसूल करा ! यात जनतेचा पैसा उधळू नका !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच विद्यार्थी असलेल्या २१ शाळा, २ विद्यार्थी – ३२ शाळा, ३ विद्यार्थी – ४७ शाळा, ४ विद्यार्थी – ५४ शाळा, ५ विद्यार्थी – ४६ शाळा, ६ विद्यार्थी – ५९ शाळा, ७ विद्यार्थी – ५७ शाळा, ८ विद्यार्थी – ४९ शाळा, ९ विद्यार्थी – ६२ शाळा आणि १० विद्यार्थी असलेल्या ५५ शाळा, अशा १० पटसंख्येच्या आतील एकूण ४८२ शाळा आहेत.’


सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

भागवताचार्य वा.ना. उत्पात

‘मंदिरे सरकारच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे होय.’

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर (साभार : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)


धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांकडून चर्च भरलेले असतात. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’ (साभार : व्हॉट्सअप)


श्री. सुनील घनवट

जगात १५७ ख्रिस्ती, ५२ मुसलमान, १२ बौद्ध आणि १ ज्यूंचे राष्ट्र आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.’ – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती