‘ब्राह्मण स्त्रियांनी ज्ञानोपासनेसमवेत बलोपासनेवरही भर दिला पाहिजे. पूर्वीच्या स्त्रिया दिवसभर कष्टाची कामे करायच्या. त्यामुळे त्या बलवान होत्या. आज स्त्रियांना विज्ञानाने दिलेल्या सुखसुविधांमुळे कष्टाची कामे करावी लागत नाहीत. त्यामुळे त्यांचा दिवसातून ३ – ४ घंटे एवढा वेळ वाचतो. हा वेळ त्या ३-४ घंटे दूरदर्शन पहाण्यात व्यर्थ घालवतात. कोणतीही आई किंवा आजी मुलीच्या अडचणी समजून घेत नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी तशाच रहातात. स्त्रियांनी अडचणी समजून घेऊन त्यांना साहाय्य करायला पाहिजे. भगवान परशुराम यांच्यात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकवटलेले दिसते. त्यांना घडवण्यात त्यांची आजी सत्यवती आणि माता रेणुका यांचा मोठा वाटा होता. पालकांनी ‘मुले आमचे ऐकत नाहीत’, हे कारण कुणी सांगू नये. मुलांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन करणे हे स्त्रीचे दायित्व आहे. प्रत्येक आईने ‘मुले अभ्यासासमवेत व्यायाम आणि योगासने यांच्या माध्यमातून बलसंपन्न होतील’, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. स्त्री ज्ञानसंपन्न आणि बलसंपन्न नसेल, तर पुढच्या पिढीची हानी होऊ शकते.’
– श्री. प्रकाश रा. मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०१६)