राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य:स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३.७.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

पोलिसांविषयी जनतेला प्रेम वाटत नाही; म्हणून असे होते, त्यामुळे याला पोलीसच उत्तरदायी आहेत !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘गुन्ह्यांचे अन्वेषण, नाकाबंदी, अतीमहनीय व्यक्तींची सुरक्षा, सण- सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे यांसाठी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता पोलीस दिवस-रात्र जनतेचे संरक्षण करत आहेत; मात्र दुर्दैवाने सद्यःस्थितीत त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. विविध कारणांनी पोलिसांवरील आक्रमणांच्या नवनवीन घटना प्रतिदिन समोर येत आहेत. पोलिसांवर हात उगारण्याची अपप्रवृत्ती राज्यात वाढत आहे. धर्मांध, गुन्हेगार इतकेच नाही, तर सध्या महिलाही पोलिसांवर हात उगारत आहेत.’


असे लज्जास्पद पोलीस जगात कुठे असतील का ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘१२.५.२०१७ या दिवशी बाबा (सासरे) डोंबिवली येथील घराच्या खालील परिसरात बसायला गेले होते. ते कुणाला काहीही न सांगता घरातून अंगावरील कपड्यांनिशी गेले. ते आम्हाला शोधूनही सापडत नव्हते; म्हणून दुसर्‍या दिवशी आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. तेव्हा पोलिसांनी ‘मोठे साहेब आलेले नाहीत’, असे सांगत आमची तक्रार लिहून घेतली नाही आणि त्यांनी आम्हाला तिथेच ताटकळत बसायला लावले.’

– सौ. ज्योत्स्ना जगताप, फोंडा, गोवा.


हे प्रशासनाला सांगावे का लागते ? प्रशासनाला स्वतःला कळत नाही का ?

मनसे कडून करण्यात आलेले घंटानाद आंदोलन

‘खासगी रुग्णालयांतून होणारी कोरोनाबाधित रुग्णांची लूट थांबवा, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी मनसेच्या वतीने कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले.’