आरोपीच्या विरोधातील ‘ककोका’ रहित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान !

गौरी लंकेश यांच्या हत्येचे प्रकरण

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – कर्नाटकमधील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील सहाव्या क्रमांकाचा आरोपी मोहन नायक याच्यावरील ‘कर्नाटक कंट्रोल ऑफ आर्गनाइज्ड क्राइम्स् अ‍ॅक्ट’ (ककोका) अंतर्गत गुन्हा रहित करण्याचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.