कॅनडामध्ये पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीवर आक्रमण !

अशी आक्रमणे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांवरच का होत आहेत ?, याचा सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

व्हँकुअर (कॅनडा) – कॅनडामध्ये काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी कुटुंबाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर आता सास्कटून शहरामध्ये पाक वंशाच्या महंमद काशिफ याच्यावर दोघा अज्ञातांनी आक्रमण करून त्याला घायाळ केले. आक्रमणकर्त्यांनी काशिफ याच्या पाठीवर चाकूने वार केले. आक्रमण करणार्‍यांनी ‘तुम्ही हा वेश (मुसलमानी वेश) का परिधान केला आहे ? तुम्ही दाढी का वाढवली आहे ? तुम्ही येथे का आला आहात ? तुम्ही तुमच्या देशात परत जा. आम्ही मुसलमानांचा द्वेष करतो’, असे ओरडून सांगितले. या वेळी आक्रमणकर्त्यांनी काशिफ याची दाढी कापली. काशिफ २० वर्षांपूर्वी पाकमधून कॅनडात आला होता. शहराचे महापौर क्लार्क यांनी या घटनेविषयी खेद व्यक्त केला आहे.