Skip to content
Skip to content
- उसाचा रस, आवळ्याचा रस किंवा कोहळ्याच्या रसासमवेत बाहव्याच्या शेंगेतील गर घ्यावा.
- अननसाचा रस घ्यावा.
- आघाड्याच्या बिया रात्रभर ताकात भिजत ठेवाव्यात आणि सकाळी वाटून ताकासमवेत घ्याव्यात.
- काकमाचीचा स्वरस, मूर्वा क्षार, जवखार अन् चिंचेच्या क्षारासमवेत द्यावा.
- कारल्याचा रस घ्यावा.
- कुटकी आणि त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासमवेत घ्यावे.
- पिकलेले केळे मधासमवेत खावे.
- वाटलेला कोहळ्याचा पाला आणि हळदीची पूड दह्यातून खावी.
- पांढरा कांदा, गूळ अन् थोडी हळद घालून सकाळी आणि रात्री खावा.
- हरभर्याच्या डाळीच्या समप्रमाणात गूळ घातलेले पुरण ३ दिवस खावे.
- १० ग्रॅम चिंचेची पाने आणि १० ग्रॅम रात्री भिजत ठेवलेली चण्याची डाळ पाण्यात वाटून ते पेय सकाळ-संध्याकाळ प्यावे.
- चिंचक्षार आणि जवखार प्रत्येकी १ ग्रॅम घेऊन चण्याच्या पाण्यासह प्रतिदिन प्यावयास द्यावे.