१. अनुभूतीविषयी जिज्ञासा निर्माण झाल्याने विचारलेला प्रश्न !
१. प्रश्न : ‘मी रामनाथी येथील आश्रमात झोपले असतांना माझ्या दोन्ही भुवयांच्या मध्ये मला सूक्ष्मातून एक जाळीदार वस्तू गोलाकारात फिरतांना दिसते. मी तिच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केल्यास ती मोठी होत असल्याचे जाणवते. मी कोलोंबो येथील माझ्या घरी असतांनाही मला अधूनमधून ही अनुभूती येते. मी तिच्याकडे पहातांना मला आतून (सकारात्मक किंवा नकारात्मक) काहीच जाणवत नाही. ‘ते नेमके काय आहे ?’, याविषयी मला जिज्ञासा आहे. मी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार उपाय शोधतांना मला अधिकतर आज्ञाचक्राच्या ठिकाणी त्रास जाणवतो. त्याचा आणि मला येणार्या अनुभूतीचा काही संबंध आहे का ?’ – कु. मेथुना, श्रीलंका
१ अ. उत्तर : तुम्हाला येणारी अनुभूती तुमच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी जाणवणार्या त्रासाशी निगडित आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये (आज्ञाचक्राच्या ठिकाणी) जाणवणारी जाळीदार वस्तू म्हणजे तुम्हाला त्रास देणार्या अनिष्ट शक्तींनी निर्माण केलेल्या विचारांचे जाळे आहे. ते नष्ट होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता किंवा विभूती लावू शकता आणि नामजपादी उपाय करतांना त्या ठिकाणी न्यास करू शकता.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेल्यानंतर काय जाणवते ?’, यासंदर्भात घेतलेला सूक्ष्मातील प्रयोग
२ अ. प्रश्न : ‘मी खोलीतील प्रवेशद्वाराजवळ आणि तेथील हस्तप्रक्षालन पात्राजवळ (सिंकजवळ) उभे राहिल्यावर मला थोडी डोकेदुखी जाणवली. खोलीत अन्य ठिकाणी मात्र मला अधिक चांगले वाटले.’ – श्री. मौलिक पटेल, ऑस्ट्रेलिया
२ अ १. उत्तर : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रवेशद्वार आणि तेथील हस्तप्रक्षालन पात्र यांठिकाणी सगुण तत्त्व कार्यरत आहे, तर खोलीत अन्य ठिकाणी निर्गुण तत्त्व कार्यरत आहे. तुम्हाला असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे तुम्हाला तसे अनुभवायला आले.
३. ‘झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले पाठीच्या खाली घेत असलेले मोठे कापड आणि त्यांच्या डोक्याखाली घेत असलेले लहान कापड यांना स्पर्श केल्यावर काय जाणवते ?’, यांचा घेतलेला सूक्ष्मातील प्रयोग
३ अ. प्रश्न : ‘आम्हाला प्रयोगासाठी २ कपडे देण्यात आले होते. त्यांतील मोठ्या कपड्याला हात लावल्यावर ‘मी पाण्यात किंवा द्रव पदार्थात हात घालत आहे’, असे मला जाणवले, तसेच त्यात एकदा माझे प्रतिबिंब दिसले. याउलट मी लहान कपड्याला हात लावल्यावर ‘मी भूमीवर हात ठेवला आहे’, असे जाणवले अन् मला धूसर दिसत होते. २ जाणिवांमध्ये एवढा भेद का ?’ – श्री. मौलिक पटेल, ऑस्ट्रेलिया
३ अ १. उत्तर : ‘मोठ्या कपड्यामध्ये प्रतिबिंब पाहू शकणे’, ही तुम्हाला आलेली विलक्षण अनुभूती आहे. मोठे कापड परात्पर गुरु डॉक्टरांच्या शरिराच्या अनाहत आणि मणिपूर या चक्रांना स्पर्श करत असल्यामुळे ते इच्छाशक्तीच्या स्तरावर अधिक कार्यरत आहे. लहान कापड परात्पर गुरु डॉक्टरांच्या आज्ञाचक्राला स्पर्श करत असल्यामुळे ते ज्ञानशक्तीच्या स्तरावर अधिक कार्यरत आहे. तुम्हाला होणार्या आध्यात्मिक त्रासामुळे तुम्हाला लहान कापड त्रासदायक वाटले. त्यामुळे तुम्ही नामजपादी उपाय करतांना आज्ञाचक्राच्या ठिकाणी न्यास करू शकता आणि एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ किंवा ग्रंथ यांचा अभ्यास वाढवू शकता.
३ आ. प्रश्न : ‘मोठ्या कपड्याला स्पर्श केल्यावर मला चांगले वाटले; मात्र लहान कपड्याला स्पर्श केल्यावर मला जाणवणारा त्रास सहन झाला नाही. असे का ?’ – श्री. देयान ग्लेश्चिच (आताचे पू. देयान ग्लेश्चिच), युरोप
३ आ १. उत्तर : दोन्ही कपड्यांमधून चांगली शक्ती वेगवेगळ्या स्तरांवर प्रक्षेपित होते. लहान कपड्यातील शक्ती ज्ञानशक्तीच्या स्तरावर प्रक्षेपित होते, तर मोठ्या कपड्यातील शक्ती इच्छाशक्तीच्या स्तरावर प्रक्षेपित होते. तुम्ही करत असलेली अध्यात्मप्रसाराची सेवा ज्ञानाशी संबंधित असल्यामुळे आणि तुम्हाला होणारा आध्यात्मिक त्रास ज्ञानशक्तीच्या स्तरावर अधिक असल्यामुळे लहान कपड्याला स्पर्श केल्यावर तुम्हाला ते सहन झाले नाही.
३ इ. प्रश्न : ‘लहान कापड हाताला ओलसर का लागले ?’ – श्री. देयान ग्लेश्चिच (आताचे पू. देयान ग्लेश्चिच), युरोप
३ इ १. उत्तर : ‘ते कापड आपतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत आहे’, असे जाणवल्यामुळे तुम्हाला ते कापड ओलसर लागले.
४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील त्यांच्या लाकडी कपाटाचा पुढील भाग आणि कपाटाच्या डाव्या अन् उजव्या बाजूचे भाग यांना स्पर्श केल्यावर काय जाणवले ?’, याचा घेतलेला सूक्ष्मातील प्रयोग
४ अ. प्रश्न : ‘मी कपाटाच्या पुढील भागाला स्पर्श केला. त्या वेळी माझे हात दुखू लागले; मात्र कपाटाच्या डाव्या अन् उजव्या भागांना स्पर्श केल्यावर माझे हात दुखायचे थांबले. कपाटाच्या पुढील भागात सगुण चैतन्य कार्यरत आहे, तर डाव्या अन् उजव्या भागात निर्गुण चैतन्य कार्यरत आहे; परंतु त्यामुळे ‘माझे हात का दुखले ?’, हे मला कळले नाही.’ – श्री. अनिकेत धवस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४ अ १. उत्तर : सूक्ष्मातील सगुण चैतन्य सहजतेने जाणवू शकते. तुमच्या संदर्भात सांगायचे झाल्यास तुमच्याभोवती असणार्या त्रासदायक आवरणामुळे तुम्हाला वेदनांच्या माध्यमातून सगुण स्पंदने जाणवली. सर्वसाधारणपणे सूक्ष्म सकारात्मक स्पंदनांच्या तुलनेत सूक्ष्म नकारात्मक स्पंदने अधिक स्थूल असतात.
४ अ १ अ. ‘प्रयोगात सहभागी झालेले श्री. अनिकेत धवस यांना अनिष्ट शक्तींचा त्रास फारसा नाही. त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लाकडी कपाटाच्या पुढील भागाला हातांनी स्पर्श केल्यावर त्या भागात कार्यरत असलेल्या सगुण चैतन्यामुळे आध्यात्मिक लाभ होऊन श्री. अनिकेत यांना असलेला थोडाफार त्रास दूर झाला. श्री. अनिकेत यांना असलेल्या थोड्याफार त्रासामुळे सगुण चैतन्यामुळे आध्यात्मिक लाभ होत असतांना त्यांचे हात दुखू लागले. त्यानंतर त्यांनी लाकडी कपाटाच्या डाव्या आणि उजव्या भागांना हातांनी स्पर्श केला, तेव्हा त्यांचा त्रास दूर झालेला असल्यामुळे त्या वेळी त्यांचे हात दुखले नाहीत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लाकडी कपाटाचा पुढचा भाग देवघरासमोर असल्याने त्या भागात सगुण चैतन्य आहे आणि कपाटाच्या डाव्या अन् उजव्या भागांत त्या तुलनेत निर्गुण चैतन्य आहे.’ – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ
५. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर उमटलेल्या तोंडवळ्यांकडे पाहिल्यावर काय जाणवले ?’, याचा घेतलेला सूक्ष्मातील प्रयोग
५ अ. प्रश्न : ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील भिंतींवर उमटलेले पांढरे डाग आणि तोंडवळे यांच्या तुलनेत खोलीतील कोपर्यांतील गडद रंगाच्या तोंडवळ्यांकडे पहातांना अधिक त्रास जाणवण्याचे कारण काय ?’ – श्री. देयान ग्लेश्चिच (आताचे पू. देयान ग्लेश्चिच), युरोप
५ अ १. उत्तर : पांढरे डाग आणि तोंडवळे यांच्या तुलनेत खोलीतील कोपर्यांतील गडद रंगाचे तोंडवळे अधिक स्थूल आहेत. त्यामुळे तुम्हाला गडद रंगाच्या तोंडवळ्यांतून प्रक्षेपित होणारी त्रासदायक स्पंदने जाणवली. साधनेने सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता वाढल्यानंतर तुम्हाला पांढरे डाग आणि तोंडवळे यांच्यातून प्रक्षेपित होणारी नकारात्मक स्पंदनेही जाणवतील.
प्रश्न : ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या छायाचित्रात त्यांच्या कंठावर आलेल्या काळ्या डागाकडे पहातांना मला त्रासदायक वाटले नाही. उलट मला असे जाणवले की, भगवान शिवाने हलाहल प्राशन केल्याप्रमाणे प.पू. बाबांनी नकारात्मकता गिळंकृत केली आहे.’
– (पू.) सौ. भावना शिंदे, अमेरिका उत्तर : (परात्पर गुरु) डॉ. आठवले : विश्लेषण योग्य आहे. |
|