अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न !

ज्येष्ठ नागरिकांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे लज्जास्पद आहे.


सातारा, १९ जून (वार्ता.) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या कोरेगाव तालुक्यातील अपशिंगे येथील ज्येष्ठ नागरिक विष्णू नारायण कदम (६५ वर्षे) यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

संशयित विष्णू कदम यांनी १३ जून या दिवशी दुपारी १२ वाजता तक्रारदार महिलेच्या घरात घुसून त्यांच्या अल्पवयीन मुलीस जवळ घेऊन अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यावर आईने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी कदम यांच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.