हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला छत्तीसगड येथील हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दुर्ग (छत्तीसगड) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी नुकतेच येथील विविध हिंदुत्वनिष्ठांशी ‘ऑनलाईन’ संपर्क साधून ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले. या अंतर्गत त्यांनी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव, कोरबा, दुर्ग, भिलाई आणि रायपूर येथील १६ हिंदुत्वनिष्ठांशी संपर्क साधला. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांमध्ये एक नवचेतना निर्माण झाली. या अभियानाच्या नंतर ‘धर्मसेना, छत्तीसगड’ या संघटनेचे श्री. विष्णु पटेल आणि त्यांचे सहकारी यांनी ‘श्री. घनवट यांचे विविध विषयांवर मार्गदर्शन मिळावे’, यासाठी नियोजन केले आहे. त्याप्रमाणे आठवड्यातून एकदा ‘ऑनलाईन’ हिंदूसंघटन बैठक चालू करण्यात आली.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. हिंदुत्वनिष्ठ श्री. नवीन पांडे यांच्या मातोश्रींचे एक मासापूर्वी निधन झाले होते. असे असतांनाही धर्मकार्यासाठी कोणतेही दुःख न बाळगता ते ‘ऑनलाईन’ संपर्क मोहिमेत तळमळीने सहभागी झाले.
२. ‘धर्मसेना, छत्तीसगड’चे श्री. विष्णु पटेल हे गेल्या अनेक दिवसांपासून ‘मला धर्मकार्यासाठी पुढील मार्गदर्शन मिळावे’, यासाठी हनुमंताला प्रार्थना करत होते. ‘या संपर्कामुळे हनुमंतानेच त्यांची इच्छा पूर्ण केली’, असे ते म्हणाले.
३. ‘सुदर्शन राष्ट्र निर्माण संघटने’चे राज्य सहप्रभारी श्री. राजेश मेहरा हे त्यांच्या सहकार्यासह दुचाकीने अन्नदान सेवेसाठी २५ किलोमीटर लांब एका गावाला जात होते. अशा स्थितीतही त्यांनी वाटेत थांबून ‘ऑनलाईन’ संपर्क मोहिमेत सहभागी झाले आणि संपूर्ण विषय समजून घेतला.
४. रायपूर येथील गोरक्षक श्री. ओमेश बिसेन आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते अन् गोरक्षक श्री. अंकित द्विवेदी हे दोघे कोरोना काळातही गोरक्षणाचे कार्य प्राणघातक आक्रमणे होऊनही तळमळीने करत आहेत. या संपर्क मोहिमेच्या वेळी त्यांनी ‘या संपर्कामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला. तसेच गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा समन्वय होऊन एकत्रितपणे कार्य चालू होईल’, असे सांगितले.
५. रायपूर येथील ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे श्री. योगेश मिश्रा व्यस्त असतांनाही त्यांनी वेळ काढला आणि ‘ऑनलाईन’ संपर्क मोहिमेत सहभागी झाले. ते म्हणाले की, छत्तीसगड राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी तुमची भेट करवून देतो अन् या उपक्रमाला प्रसिद्धी देण्याचे दायित्व मी घेतो.
६. या व्यतिरिक्त सर्वश्री संजय साहू, समीर क्षत्री, अरुण राव, गोविंदराज नायडू आणि त्यांच्या पत्नी अधिवक्ता सौ. रचना नायडू आदी हिंदुत्वनिष्ठांनी या ‘ऑनलाईन’ संपर्क मोहिमेत सहभाग घेतला.
तळमळीने धर्मकार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांविषयी ‘ऑनलाईन’ संपर्कातून मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती
१. रायपूर येथील श्री. प्रेमप्रकाश साहू हे त्यांच्या संघटनेच्या वतीने अनेक अडचणींवर मात करून दळणवळण बंदीच्या काळात अन्नदान करण्याचे कार्य करत आहेत.
२. दळणवळण बंदीच्या काळात कोरबा येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. राणा मुखर्जी आणि त्यांच्या संपर्कातील सर्व संघटना यांनी ‘भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे’, या मागणीची ११ सहस्र जणांकडून पत्रे लिहून घेतली आणि ती पंतप्रधानांना पाठवली.
३. ‘हिंदु युवा मंच’चे संयोजक श्री. गोविंदराज नायडू यांनी स्वतः सनातन संस्थेने कोरोनाकाळात आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी सांगितलेला ‘श्री दुर्गादेवी (३ वेळा), दत्त (१ वेळा), श्री दुर्गादेवी (३ वेळा), शिव (१ वेळा)’ हा नामजप करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच श्री. नायडू यांनी त्यांच्या १८ ते २० सहकार्यांनाही हा नामजप करण्यास सांगितले आहे. याचसमवेत श्री. नायडू हे त्यांच्या सहकार्यांना साधना कळावी, यासाठी एका मार्गदर्शनाचे आयोजनही करणार आहेत.