पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध उपक्रम

कोल्हापूर युवासेना यांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमी इथे शेणी दान !

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान करतांना मंजित माने, संजय पवार, तसेच अन्य

कोल्हापूर – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर युवासेना यांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमी इथे अंत्यविधी करणेसाठी २ सहस्र ५०० शेणी दान करण्यात आल्या. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, युवासेना जिल्हा युवाअधिकारी मंजीत माने, शिवाजी जाधव, विनायक जाधव, वैभव जाधव, चैतन्य देशपांडे, अभिजित लोखंडे यांसह अन्य उपस्थित होते.

युवा सेना सांगलीच्या वतीने सांगलीत शिंदे मळा परिसर आणि अन्य ठिकाणी वृक्षारोपण

सांगली युवासेनेच्या वतीने वृक्षारोपण करतांना युवासैनिक आणि नागरिक

सांगली – युवासेनाप्रमुख माननीय आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेनेच्या वतीने सांगलीतील शिंदे मळा परिसर आणि अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. युवा सेना या वृक्षांचे संवर्धन करणार आहे. या वेळी रवि आंबे, संदीप कांबळे, महेश हरमलकर, प्रतिक वाघमोडे, साई कोळी, प्रतिक माने यांसह अन्य उपस्थित होते.

युवा सेना तासगावच्या वतीने कोरोना रुग्णांना जीवनावश्यक वस्तू आणि तुळस रोपांचे वाटप

युवा सेना तासगावच्या वतीने कोरोना रुग्णांना जीवनावश्यक वस्तू आणि तुळस रोपांचे वाटप करतांना शिवसेना आणि युवासेना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते

तासगाव – युवासेना तासगाव तालुक्याच्या वतीने कोरोना केंद्रात रुग्णांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्याचससमवेत प्राणवायू देणारे रोप म्हणून तुळस या रोपांचे वाटप करण्यात आले आणि तुळशीचे रोप केंद्रात लावण्यात आले. या वेळी  सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप माने, शिवसेना शहरप्रमुख संजय चव्हाण, युवासेना सांगली जिल्हा युवा अधिकारी विनायक गोंदील, तालुका युवा अधिकारी नंदकुमार मंडले, विशाल शिंदे, पैलवान सुशांत, समरजित पवार यांसह अन्य उपस्थित होते.