१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देणार
पणजी, ११ जून (वार्ता.)- गोवा राज्यात येत्या रविवारपासून म्हणजे १३ जूनपासून ‘टिका (लसीकरण) उत्सव’ चालू करणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. या ‘टिका उत्सवा’मध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल. याविषयी जनतेला संबोधून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘१८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी गोवा राज्यातील ग्रामपंचायती आणि नगरपालिका मिळून ८७ केंद्रे चालू करण्यात येतील. या वयोगटातील सर्व लोकांचे लसीकरण ३० जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपालिका या ठिकाणी लस देण्याविषयीचे वेळापत्रक दिले जाईल. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याची आवश्यकता नाही. या लसीच्या लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी थेट केंद्रावर जावे. प्रत्येक केंद्रात प्रतिदिन लसीचे २५० डोस दिले जातील.