ईश्वर मानवाचा अहंकार मोडून काढत असल्याची प्रचीती देणारी कोरोनाची दुसरी लाट !

कोरोनासाठी मार्गदर्शक सदर !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे यांविषयी समाजातील बहुतेक लोकांना गांभीर्य नव्हते. ‘मला काहीच होणार नाही’, हा मानवामधील अहंकार या निष्काळजीपणाला कारणीभूत आहे. आता दुसर्‍या लाटेत मात्र रुग्ण आणि मृत यांची संख्या झपाट्याने वाढल्यावर मात्र ‘मला काहीच होणार नाही’, हा मानवामधील अहंकार काही प्रमाणात उणावलेला दिसतो. पहिल्या लाटेच्या वेळी बहुतांश लोक मास्क न लावता फिरत होते; मात्र आता दुसर्‍या लाटेच्या वेळी बहुतांश लोकांना एकावर एक असे दोन मास्क घालावे लागत आहेत आणि काटेकोरपणे सामाजिक अंतर पाळावे लागत आहे.

कलियुगात बहुतांश मानवांमध्ये ‘मी सर्वश्रेष्ठ’ असल्याचा अहंकार निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोरोना महामारी येण्यापूर्वी मानव बिनधास्तपणे वावरत होता. मानवाला ना ईश्वराचे भय होते, ना धर्माचरणाची आवश्यकता जाणवत होती. ईश्वर मानवातील अहंकार नष्ट करण्यासाठी निसर्गाची छडी कशी वापरतो, हे लक्षात घेऊन आणि पुढे येणार्‍या मोठ्या आपत्काळाची चाहूल ओळखून मानवाने आतातरी शहाणे होऊन स्वरक्षणासाठी धर्माचरणी बनावे अन् साधना करावी.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२१)